शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेची रणधुमाळी सुरू

By admin | Updated: January 12, 2017 00:05 IST

आचारसंहिता लागू : २१ फेब्रुवारी रोजी मतदान, २३ रोजी निकाल

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान, तर दि. २३ फेबु्रवारी २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे. येत्या २१ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी घोषित झाल्यानंतर दि. २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या काळात उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बुधवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेपासूनच आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, राजकीय पक्षांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत.  नाशिक महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक काळाची मुदत १४ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागून होते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि लगेच आचारसंहिता लागू झाली. महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांच्या  कालावधीत प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी पक्षकार्यालये गजबजणार असून, खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.  निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्याने राजकीय पक्षांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. महापालिकेने तातडीने शहरात निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली आहे.