शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या २४ फेऱ्या पूर्ण; गोडसे २ लाख ८१ हजार मतांनी भुजबळांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:39 PM

मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे

ठळक मुद्देभुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ६४ हजार ५२९ मते

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाºया नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते; मात्र मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे. गोडसे यांनी विजयाचा जल्लोष साजरा क रण्यास सुरूवात केली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्यांत सुरू असून नाशिकमध्ये २४व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ५ लाख ४५ हजार ७१३ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ६४ हजार ५२९ मते पडली आहेत.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNashikनाशिकShiv Senaशिवसेना