नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स

By संजय पाठक | Updated: March 10, 2023 07:18 IST2023-03-10T07:16:01+5:302023-03-10T07:18:08+5:30

शिवसेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयाच्या पेजवर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Nashik Facebook page of uddhav Thackeray group hacked and uploaded obscene clips | नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स

नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स

नाशिक- नाशिकमध्ये अज्ञात व्यक्तीद्वारे नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नावाचे फेसबुक पेज हॅक करून त्यात अश्लील क्लिप्स लावण्यात आल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री अकरा वाजता तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार अर्ज दिला आहे.

शिवसेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयाच्या पेजवर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता एक पोस्ट टाकण्यात आली आणि त्यानंतर परत रात्री वेगवेगळ्या क्लिप्स टाकण्यात आल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

अशाप्रकारच्या पोस्टमुळे पक्षाची बदनामी झाली असून गैरसमज वाढणार आहेत. त्यामुळे संबंधिताचा शोध घेऊन तातडीने अटक करावी, हे पेज बंद करावे असे बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, बाळासाहेब कोकणे, संदीप कानडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात नमूद करण्यात आहे.

Web Title: Nashik Facebook page of uddhav Thackeray group hacked and uploaded obscene clips