शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या कॉपी प्रकरणात नाशिकची जळगावसोबत बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:49 IST

नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह्यात केवळ एक कॉपीचे प्रकरण आढळून आले आहे, तर नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. 

ठळक मुद्देबारावी परीक्षेत कॉपींची शंभरीनाशिक, जळगावात प्रत्येकी 38 कॉपी नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे

नाशिक : बारावीची परीक्षेचे सर्व पेपर झाले असून परीक्षेच्या पूर्वार्धातच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह्यात केवळ एक कॉपीचे प्रकरण आढळून आले आहे, तर नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासणी दिली आहे. नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३, धुळे जिल्ह्यातून २५ हजार २६४, जळगावमधून ४९ हजार ४०३, नंदुरबार जिल्ह्यातील १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग जळगावमध्ये कॉपीची प्रकरणे उघड होत असल्याने परीक्षेच्या पूर्वार्धात झालेल्या वेगवेगळ्या पेपरमध्ये जळगावमधून सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. त्यातुलनेत काहीसा पिछाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातही उर्वरित पेपरमध्ये कॉपी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सुरुवातीला दुसºयास्थानी असलेल्या नाशिकने कॉपी प्रकरणांमध्ये जळगवाची बरोबरी साधली असून, परीक्षा संपल्यानंतर नाशिक व जळगावमध्ये प्रत्येकी ३८ कॉपी प्रक रणे समोर आली आहे. तर नंदुरबार २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याने दुसºया स्थारनावर आहे. धुळे जिल्ह्यात परीक्षेच्या पूर्वार्धात एकही कॉपीचे प्रकरण समोर आले नव्हते. परंतु उत्तरार्धात धुळ्यात एक कॉपीचे प्रकरण समोर आल्याने विभागात कॉपी प्रकरणांनी शंभरी गाठली आहे. या परीक्षेत कॉपीमुक्त होण्यापासून धुळे जिल्हा केवळ एक पाऊल दूर राहिला. मात्र कॉपीमुक्तीच्या दिशेने  जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु  असल्याचे जिल्हा शिक्षण विभागाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  गेल्यावर्षी सर्वाधिक कॉपी प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव चर्चेत राहिलेले असताना यावर्षीही जळगावातील भडगाव येथील परीक्षा कें द्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रति तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यामुळे नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी