शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 17:48 IST

Nashik Vidhansabha Election Results 2019सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली.

ठळक मुद्देमतदारांनी पुन्हा भाजपला कौल दिला.सीमा हिरे यांना ७७ हजार ७४ मते मिळाली

नाशिक : पाश्चिम मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळाली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंड पुकारून थेट भाजपच्या उमेदवार विद्यमान सीमा हिरे यांना आव्हान देत बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविले. तसेच सीमा हिरे यांना राष्टÑवादीकडून उमेदवारी करणारे डॉ. अपुर्व हिरे यांनीही टक्कर दिली. सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली.सीमा हिरे यांनी पुर्वीपासून त्यांच्या मतदारांशी असलेला संपर्क टिकवून ठेवल्यामुळे यंदाही त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ त्यांच्या मतदारसंघातून झाल्याने या यात्रेचाही प्रभाव येथील मतदारांवर पहावयास मिळाला. मतदारांनी त्यांच्या बाजूने दणदणीत कौल दिला. सुरूवातीपासूनच हिरे यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत मोठा फरक त्यांच्या व अपुर्व हिरें यांच्या मतांच्या आकडेवारीत कायम राहिला. २७ फे ऱ्या पूर्ण झाल्यानंतर सीमा हिरे यांना ७७ हजार ७४ मते मिळाली.पश्चिम मतदार-संघात बंडखोरीची परंपरा चालू निवडणुकीतही जोपासली गेली. ज्या शिवसेनेने गेल्या दोन निवडणुकीत बंडखोरी केली त्यांना त्याचा कधीच फायदा झाला नाही हे खरे असले तरी, त्यांच्या बंडखोरीमुळे दुस-या उमेदवाराचे नुकसान झाल्याचे आजवरच्या लढतीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात होणा-/या पंचरंगी लढतीतील सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सेनेच्या बंडखोरीचा लाभ कोणाला तारक व कोणाला मारक ठरतो याकडे मतदारांचे लक्ष लागले होते; मात्र त्याचा कुठलाही परिणाम भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विजयावर झाला नाही.कामगार व मध्यमवर्गीय मतदारांचा भरणा असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा चुरशीची निवडणूक होईल याचे संकेत निवडणूकपूर्व तयारीतूनच मिळत होते. त्यामुळे अपेक्षेनुरूप सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपाने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा तिकीट देऊन जागा राखण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला.या मतदारसंघाने आजपर्यंत एकाच पक्षाची कधीही पाठराखण केलेली नव्हती मात्र या निवडणूकीत ही परंपरा खंडीत झाली आणि मतदारांनी पुन्हा भाजपला कौल दिला. खान्देश व कसमादे येथील मतदारांचा अधिक भरणा असल्यामुळे तेथील राजकीय परिस्थितीचा पश्चिम मतदारसंघावर प्रभाव पडत असतो.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाnashik-pcनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस