शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

नाशिक निवडणूक निकाल : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने राखला; सरोज आहिरेंची ३३ हजार मतांनी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:49 IST

Nashik Vidhansabha Election 2019 प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे.

ठळक मुद्दे३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. घोलप यांना आव्हान देण्याची दाखविलेली जिद्द यशस्वी

नाशिक: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात जनतेने मोठे परिवर्तन घडविले आहे. राष्ट्रवादी  कॉँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करणाऱ्या मनपाच्या नगरसेवक सरोज आहिरे यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता केवळ शिल्लक राहिली आहे. मतमोजणीच्या १५ फे-या पूर्ण झाल्या असून आहिरे यांना ७० हजार ६९० मते तर प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे.या मतदारसंघात कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार असलेल्या सरोज आहिरे यांनी घोलप यांना आव्हान देण्याची दाखविलेली जिद्द यशस्वी होताना दिसून येत आहे. अखेरच्या ४ फे-या शिल्लक असून ३५ हजारांपेक्षा अधिक मतांनी आहिरे आघाडीवर आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात घोलप यांना नेहमीच मतविभागणीचा फायदा झालेला आहे किंबहुना त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकांना रिंगणात उतरवून तशी राजकीय खेळी यशस्वी करूनही दाखविलेली आहे.घोलप यांच्यासमोर उभे राहण्याचा चंग बांधलेल्या सरोज अहिरे यांनी युतीच्या घोषणेनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. अहिरे यांची उमेदवारी देवळालीतील समीकरण बदलवणारी ठरली. अर्थात घोलप यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका त्यांच्यात रुजविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते मात्र ते त्यांनी लिलयापणे पेलल्याचे दिसून येते. बहुतांश ग्रामीण भाग या मतदारसंघाला जोडला असल्यामुळे त्यांची मतदारांपर्यंत पोहचण्यास दमछाक झाली असली तरी त्या मेहनतीचे फळ त्यांना जनतेकडून मिळाले आहे. लक्ष्मण मंडाले यांनाराष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या मुलाच्या पारड्यात पडणारे मतदान अहिरे यांच्यासाठी धोक्याचे मानले जात होते; मात्र जनतेने समीकरण बिघडवू दिले नाही.सर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा या मतदारसंघाचा प्रवास आहे. १९७४ पर्यंत नाशिक-देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रूपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले.१९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपाचे भिकचंद दोंदे यांनी प्रथमच कमळ फुलविले आहे. १९९० मध्ये युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले.--* देवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. यंदा केवळ चारच अपक्ष आहेत तर वंचितच्या प्रभावाची चर्चा नसल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.*घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे पक्ष आलटून-पालटून उभे राहिले, त्याचा लाभ घोलप यांनाच होत गेला. अनुसूचित जातीसाठी राखीव असा हा मतदारसंघ असताना समाजाच्या राजकारणामुळे अन्य उमेदवारांना अपेक्षित मते मिळत नाहीत. यंदा सरोज अहिरे-घोलप यांची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता आहे.मतदारसंघातील कळीचे मुद्दे* नासाका आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रलंबिंत प्रश्न.* बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यास अपयश.* ग्रामीण भागाला तीस वर्षांपासून शाश्वत विकासाची प्रतीक्षा.* पर्यटन, शिक्षण आणि उद्योग प्रकल्प नाही.* व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा मुद्दा.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019devlali-acदेवळालीNashikनाशिकVotingमतदानNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना