शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

नाशिक पूर्व-पश्चिम मतदारसंघांत मोठी चुरस, भुजबळांच्या नांदगावकडे राज्याचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 22:24 IST

सिन्नरसह चांदवड, निफाड, येवला, नांदगाव येथे गेल्यावेळेप्रमाणोच होताहेत लढती

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने अंतिम टप्प्यात चांगलाच वेग घेतल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या लढती उत्कंठावर्धक ठरून गेल्या आहेत. यातही सर्वाधिक उमेदवार असलेल्या व शिवसेनेच्या उघड बंडखोरीमुळे लक्षवेधी ठरून गेलेल्या नाशिक पश्चिम आणि ऐनवेळच्या पक्षांतरातून आमने-सामने उभ्या ठाकलेल्या उमेदवारांमुळे नाशिक पूर्वमध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. जिल्ह्यातील येवला, नांदगावमध्ये भुजबळ पिता-पुत्र उमेदवार असल्याने व मालेगाव (बाह्य)मध्ये राज्यमंत्र्यांसमोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आव्हान उभे केले असल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रचाराच्या शेवटच्या चरणात सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीचा माहौल तापून गेला आहे. जिल्ह्यात सर्वच जागांवरील युती व आघाडीच्या उमेदवारांखेरीज मनसे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बहुसंख्य जागांवर लढत देत असून, एमआयएम, बसपा, माकपा, पिपल पार्टी ऑफ इंडिया, बहुजन विकास आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, आंबेडकराईट पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी, रिपाई(अे), भाकप, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र क्रांती सेना, आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती आदी पक्षांचेही उमेदवार काही जागांवर आहेत.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 19 उमेदवार सिडको व सातपूर परिसराचा समावेश असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात असून, तिथे भाजपच्या विद्यमान आमदार सौ. सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे आपले राजीनामे पाठवून शिंदे यांच्या पाठीशी बळ उभे केले आहे, तर राष्ट्रवादीचे डॉ. अपूर्व हिरे यांचासारखा राजकीय वारसा लाभलेला उमेदवार समोर आहे. दोघा हिरेंनी घरोघरी व थेट मतदारांर्पयत संपर्क चालविला आहे. अर्थात, माकपचे डॉ. डी. एल. कराड व मनसेचे दिलीप दातीर आदीही रिंगणात असल्याने मतविभागणी मोठय़ा प्रमाणात होण्याची चिन्हे पाहता चुरस वाढून गेली आहे. 

पंचवटी व नाशिकरोडचा बराचशा भागाचा समावेश असलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत, तर मनसेचे प्रांतीय पदाधिकारी राहिलेल्या राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ऐनवेळी पक्षांतर करून उमेदवारी करणा:या दोघा प्रमुख पक्षीय उमेदवारांमधील लढत औत्सुक्याची ठरली आहे.

नाशिक मध्यमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांची लढत प्रामुख्याने काँग्रेस आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील व मनसेचे नितीन भोसले यांच्याशी होत आहे. प्रारंभी पाटील व भोसले हे दोन्हीही ऐनवेळेचे उमेदवार म्हणून तुल्यबळ  म्हणवले जात नव्हते; परंतु अखेरच्या चरणात त्यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने येथील लढतीतही रंग भरला आहे. देवळालीत  शिवसेनेच्या योगेश घोलप यांच्यापुढे यंदा राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे व मनसेचे सिद्धांत मंडाले यांनी ब:यापैकी आव्हान उभे केले आहे.

ग्रामीण भागात सिन्नर, दिंडोरी, इगतपुरीत जवळ जवळ दुरंगीच लढतीचे चित्र आहे. सिन्नरमध्ये शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे व माणिकराव कोकाटे यांच्यात पारंपरिकपणो सामना होत आहे. गेल्या लोकसभा निवडणूकप्रसंगी भाजप सोडलेले कोकाटे यंदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत देत आहेत तर दिंडोरीत राष्ट्रवादीचे आमदार नरहरी ङिारवाळ यांची लढत शिवसेनेच्या भास्कर गावित यांच्याशी होत आहे. पेठ व दिंडोरीतील प्रादेशिकतेचा मुद्दा व सजातीय समीकरणो येथे महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.

कळवणमध्ये राष्ट्रवादीचे नितीन पवार व माकपचे जे. पी. गावित यांच्यात खरी लढत होत आहे. शिवसेनेच्या मोहन गांगुर्डे यांच्यासह अन्यही उमेदवार रिंगणात आहेत. येथेही कळवण व सुरगाण्याचा प्रादेशिक वाद उफाळताना दिसत असून, नितीन पवार यांना पित्याच्या पुण्याईचा लाभ अपेक्षित आहे, तर गावित पारंपरिक मतांवर भिस्त ठेवून आहेत.

सिन्नरप्रमाणोच चांदवड-देवळा, निफाड, येवला, नांदगाव येथेही गेल्यावेळी परस्परांसमोर लढलेल्यांमध्येच यंदाही लढती होत आहेत. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर व काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांच्यात चुरस आहे. तर निफाडमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल कदम व राष्ट्रवादीचे दिलीप बनकर एकमेकांसमोर आहेत. अर्थात मुख्यमंत्र्यांनी आहेर यांना तर शिवसेनेच्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कदम यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे सांगून त्यांची वाट निर्धोक करण्याचा प्रयत्न केला आहे. इगतपुरीत काँग्रेस सोडून शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या निर्मला गावित यांचा सामना राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या हिरामण खोसकर यांच्याशी होत आहे. मनसे व वंचित बहुजन आघाडीच्या अन्य उमेदवारांमुळे येथेही मते विभागणीची भीती व्यक्त होत आहे. बागलाणमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्यापुढे भाजपचे दिलीप बोरसे यांनी आव्हान उभे केले आहे. 

मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसचे आमदार आसिफ शेख व एमआयएमचे मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. तर मालेगाव बाह्यमध्ये राज्यमंत्री शिवसेनेचे दादा भुसे यांच्यासमोर यंदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

येवला, नांदगावकडे राज्याचे लक्ष

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे येवल्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. भुजबळ यांच्यासमोर शिवसेनेचे संभाजी पवार असून, भूमिपुत्र विरुद्ध विकास अशा मुद्दय़ांवर येथे भर दिला जाताना दिसत आहे. भुजबळांची आक्रमकता टिकून असल्याने हा सामनाही सोपा नाही. तर भुजबळ पुत्र पंकज हे उमेदवारी करीत असलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे हे गेल्यावेळेचेच उमेदवार रिंगणात आहे. भाजपचे बंडखोर रत्नाकर पवार यांच्यामुळे  होणारे मतविभाजन येथे महत्त्वाचे ठरू शकते.

सर्व विद्यमानांसोबतच सात माजी आमदार रिंगणात

जिल्ह्यातील सर्व पंधरा विद्यमान आमदार यावेळी पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असून, त्यांच्यासोबत सिन्नर, सटाणा, चांदवड, निफाड, मालेगाव मध्यचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले तसेच विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले असे सात माजी आमदारही रिंगणात आहेत. या सातही ठिकाणी आजी-माजी आमदारांत सामने रंगलेले दिसत आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारणnandgaon-acनांदगाव