शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

नाशिक जिल्ह्यात महाजनादेश राष्टवादीला; शिवसेनेची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 02:18 IST

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी सर्वाधिक सहा जागा राष्टवादीच्या पारड्यात टाकत या पक्षाला महाजनादेश दिला. सहापैकी पाच जागा जिंकत भाजप सेफझोनमध्ये राहिला असला तरी मित्रपक्ष शिवसेनेला मात्र, अवघ्या दोन जागा राखता आल्या आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी सर्वाधिक सहा जागा राष्टवादीच्या पारड्यात टाकत या पक्षाला महाजनादेश दिला. सहापैकी पाच जागा जिंकत भाजप सेफझोनमध्ये राहिला असला तरी मित्रपक्ष शिवसेनेला मात्र, अवघ्या दोन जागा राखता आल्या आहेत. काँग्रेसने एक जागा जिंकत अस्तित्व राखले तर एमआयएमनेही एक जागा मिळवित चंचूप्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विजयी झाले असले तरी त्यांचे पुत्र पंकज यांना मात्र नांदगावमधून पराभवास सामोरे जावे लागले.जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत नाशिक व चांदवडखेरीज बागलाणची एक जागा अधिकची मिळविली आहे. सर्वात जास्त पडझड शिवसेनेची झाली असून, तीन विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला तर नांदगाव व मालेगाव बाह्य या दोन जागांवर समाधान मानावे लागले.पक्षांतर : काहींचे फावले, काहींना भोवलेनिवडणूकपूर्व मेगाभरतीची लागण नाशिक जिल्ह्यालाही झाली होती. त्यात नाशिक पूर्वमध्ये मनसेचे राहुल ढिकले यांनी भाजपत, देवळालीत भाजपच्या सरोज अहिरे यांनी राष्टÑवादीत, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांनी राष्टÑवादीत, इगतपुरीत राष्टÑवादीचे हिरामण खोसकर यांनी कॉँग्रेस, तर मालेगाव मध्य मतदारसंघात राष्टÑवादीचे मौलाना मुफ्ती यांनी एमआयएमकडून उमेदवारी करत विजयश्री मिळविली.नाशिक पूर्वमधून आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांनी ऐनवेळी राष्टÑवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यांनी निकराची झुंज दिली असली तरी अंतिमत: पराभव पत्करावा लागला. इगतपुरीतही कॉँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेचे तिकीट मिळविले; पण तेथे कॉँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला. नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचे विलास शिंदे, तर नांदगावमध्ये भाजपचे रत्नाकर पवार यांचे बंड फसले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना