राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST2018-02-21T22:56:53+5:302018-02-22T00:15:36+5:30
राज्यस्तरीय मुलांच्या सबज्युनिअर लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा लगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या सबज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा शिर्डी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या मुलांच्या संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करत नेत्रदीपक खेळ करीत सुवर्णपदक मिळून दिले.

राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याला सुवर्णपदक
निफाड : राज्यस्तरीय मुलांच्या सबज्युनिअर लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा लगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या सबज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा शिर्डी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या मुलांच्या संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करत नेत्रदीपक खेळ करीत सुवर्णपदक मिळून दिले.
राज्य लगोरी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदनगर विरुद्ध नाशिक यांच्यात होऊन नाशिक संघाने १-२ असा सहज विजय मिळवून अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेत मुलीचे १५ व मुलाचे १७ संघ सहभागी झाले होते. नाशिक संघाकडून नीरज तौवर (कर्णधार), समर्थ निकम (उपकर्णधार), दीपक पवार, ओम पवार, मानवराजे वाघ , सुमेध बोदडे, अनुज बागडे, समीर सानप, कार्तिक जाधव, जुनेद पठाण, रोशन शिंदे, शिवकुमार बोरगुडे, सुदर्शन निचित यांनी यशस्वी खेळ करीत संघाला विजयश्री मिळवून दिला. यशस्वी खेळाडूंचे नाशिक जिल्हा लगोरी असोसिएशनचे सचिव दत्तागिरी गोसावी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, सेक्रेटरी हेमंत बरकले, निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलाल चोरडिया, सरस्वती विद्यालयचे अध्यक्ष प्रवीण कराड, शिवाजी ढेपले, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापक ज्योती भागवत, यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.