शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:43 PM

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली

ठळक मुद्देशासनाकडे थकीत असलेली रक्कम बँकेला परत मिळत नाही.

नाशिक ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाचा प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाबींमुळे बँकेचे एक हजार कोटी रुपये शासनाकडे अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री असूनही चेअर मन वगळता बँकेवर सर्वपक्षीय संचालक असताना बँकेची हेळसांड व पर्यायाने खरिपासाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचण वाढली आहे.राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली, त्यानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक लाख, 5865 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती शासनाकडे सादर केली. या शेतकऱ्यांचे सुमारे 970 कोटी 53 लाख रुपये इतके कर्ज आहे. शासनाच्या मान्यतेने फेब्रुवारी महिन्यात बँकेने ही माहिती शासनाला कळविली, परंतु त्याच दरम्यान राज्यात नाशिकसह 5 जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडूनकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला, त्यामुळे आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाने जिल्हा बँकेच्या कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली नाही, मात्र बँकेने सदरची यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली. शासन जो पर्यंत ती जाहीर करीत नाही, तो पर्यंत त्या यादीतील कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करता येत नाही, आधार प्रमाणिकरणासाठी शेतकऱ्यांना सोसायट्यांवर कागदपत्रे घेऊन जावे लागणार आहे. मात्र तशी वेळ येण्यापूर्वीच मार्च महिन्यात देशात व राज्यात कोरोनाचे थैमान घालण्यास सुरुवात केली, परिणामी ग्राम पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, मात्र शेतकरी कर्जमुक्तीचा विषय मागे पडला आहे. लॉक डाऊन, संचारबंदी आणि शासनाचे गर्दी न करण्याचे आवाहन पाहता जिल्हा बँकेच्या शेतकरी कर्जमुक्तीच्या यद्यांचे कामही मागे पडले, परिणामी जिल्हा बँकेच्या कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करणे व त्यापोटी मिळणाऱ्या सुमारे ी‘ हजार कोटी रुपयंपासून वंचित राहावे लागत आहे. बँकेची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज वाटप करन्यासाठी शासन एकीकडे बँकांवर दबाव टाकत आहे तर दुसरीकडे शासनाकडे थकीत असलेली रक्कम बँकेला परत मिळत नाही. त्यामुळे जिल्हा बँक दुहेरी पेचात सापडली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक