शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा : वर्षभरात रस्त्यावर ९०० लोकांनी गमाविला प्राण; १हजार ८०० जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:17 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख्या ८३ ने कमी होऊन ९०४वर पोहचली असली तरी अवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले असून ...

ठळक मुद्दे२०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखीअवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले मागील वर्षी अपघातांची संख्या २१९० इतकी होती

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख्या ८३ ने कमी होऊन ९०४वर पोहचली असली तरी अवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग या शासकिय यंत्रणांसोबत प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वय साधून जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्र शोधून काढत त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे उपाययोजना करुन अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीमार्फत देण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून जरी विविधप्रकारे उपाययोजना व अभियानांमार्फत लोकजागृतीवर भर दिला जात असला तरी अद्याप पाहिजे तसे यश या शासकिय यंत्रणेला प्राप्त झालेले नाही. केवळ आठ टक्क्यांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण मागील वर्षी कमी झाले तर अपघातांचा आकडा बघितला असता त्यामध्येही खूप तफावत आढळून येत नाही. २०१६ साली ३ हजार ३८ अपघात नाशिक जिल्ह्यात विविध भागांमध्ये झाले तर मागील वर्षी अपघातांची संख्या २१९० इतकी होती. एकूण ८४८ अपघात मागील वर्षी कमी झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रयत्नांना काही अंशी यश येताना जरी दिसत असले तरी चालू वर्षात ही संख्या अजून कमी करण्याचे आव्हान आहे.

संगणकीकृत परवाना चाचणीशहरी व ग्रामिण भागात संगणकीकृत उमेदवारांना वाहन परवाना चाचणीला सामोरे जावे लागत आहे. या चाचणीमुळे ज्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती व अभ्यास आहे, अशाच उमेदवार चाचणीमध्ये पात्र ठरत आहे. या संगणकीकृत प्रणालीद्वारे ग्रामिण भागात अद्याप टॅबलेटद्वारे १८ हजार ३४७ अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये चौदा हजार १४७ अर्जदार उत्तीर्ण होऊ शकले.३५ हजार वाहनांना योग्यता प्रमाणपत्रप्रादेशिक परिवहन विभागाने नादुरस्त वाहनांमुळे रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी यंत्र दोन वर्षांपासून सुरू केले आहे. यामाध्यमातून सुमारे ६६ हजार ५६२ वाहने तपासण्यात आली. त्यापैकी ३५ हजार वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातhighwayमहामार्ग