शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

Nashik: दिलीप बनकर यांनीही केले शरद पवारांचे स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:50 IST

Dilip Bankar: कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार अनिल कदम यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर फडकवल्यामुळे दिलीप बनकरांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

- सुदर्शन सारडा नाशिक - येवला येथे आज शरद पवारांची जाहीर सभा होत असताना राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील आणि सजग असलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर हे विकासामुळे अजित पवार गटात सामील झाले असले तरी मागील काळात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी शरद पवारांना दैवत म्हणून संबोधलं होतं. अशातच पवार प्रेमींचा उत्साह हा नाशिक जिल्ह्यात ढवळून निघाला असताना त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार अनिल कदम यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर फडकवल्यामुळे दिलीप बनकरांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

अशातच एकूण राजकीय गणित बघता दिलीप बनकरांच्या समर्थकांनी देखील ठिकठिकाणी शरद पवार यांचे निफाड नगरीत हार्दिक स्वागत असे बॅनर झळकून त्या बॅनरवर वरती अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या तिघांचेही फोटो लावल्याने साहेबांप्रति निष्ठा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न म्हटला जात आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार यांच्या राजकीय वलयामुळे दिलीप बनकर हे तराजूत राजकारण तोडत आहे की खरोखर अजित पवार गटात गेले आहे, हे येणाऱ्या काही दिवसात समोर येईलच, तूर्तास तरी ज्या शरद पवारांच्या ब्रँडमुळे बनकर यांच्या घरात दोनदा आमदारकी आणि अनेक सत्तापद आल्याने त्यांनीही साहेबांप्रतिनिष्ठा पुन्हा एकदा दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह हा समान साधला आहे.

जितेंद्र आव्हाडही दौऱ्यातज्या जितेंद्र आव्हाड यांनी बनकर यांच्यावर आगपाखड केली, तेही शरद पवार यांच्यासोबत असल्याने बनकर यांच्यावर आव्हाड काय बोलतात हे ही ऐकणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूण राजकीय समीकरण पाहता आव्हाड गेले तरी मुंडेंचे फोटो वरच्या स्थानी ठेवल्याने राजकीय परमार्थ साधण्याचा प्रयोग ही होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार