शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

नाशिकमध्ये पेट्रोलची नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये प्रतिलिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 5:05 PM

शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या दराने पेट्रोल विकले जात असल्याचा प्रकार घडतो आहे. पेट्रोल वाहतूक खर्चातील तफावतीमुळे हा फरक असला तरी बहुतांश पेट्रोल पंपावर निर्धारित किमती पेक्षा २० ते २५ पैसे अधिक किमतीने पेट्रोल विक्री होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये इंधनाचे दर भडकलेपेट्रोल ८९.७२ रुपये तर डिझेल ७७.४८ रुपये प्रतिलिटर

नाशिक : शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या दराने पेट्रोल विकले जात असल्याचा प्रकार घडतो आहे. पेट्रोल वाहतूक खर्चातील तफावतीमुळे हा फरक असला तरी बहुतांश पेट्रोल पंपावर निर्धारित किमती पेक्षा २० ते २५ पैसे अधिक किमतीने पेट्रोल विक्री होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे.नाशिकमध्ये तेल कंपन्यांनी निर्धारित केलेल्या किमतीप्रमाणे रविवारी ८९.७२ रुपये पेट्रोलचे दर असताना काही पेट्रोल पंपावर ८९.९८ रुपये दराने पेट्रोलची विक्री होत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. तसेच ग्राहकांना रोज बदलणाºया किमती माहिती व्हाव्या यासाठी सर्व पेट्रोल पंपचालकांना पेट्रोलचे बदललेले दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना असतानाही बहुतांश पेट्रोलपंप चालकांनी अशाप्रकारे फलक लावणे टाळलेले आहे. अनेक पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी  कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सहकार्य केले जात नसून ग्राहकांना शंभरच्या पटीत पेट्रोल भरण्यास सांगितले जात असून, लिटरच्या प्रमाणात पेट्रोल भरण्यात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांकाडून पेट्रोलच्या वाढत्या किमतींवरून सरकारविरोधात रोष पसरत असतानातच वितरण प्रणालीविषयीही ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.ग्राहकांमध्ये संतापसंपूर्ण देशभरात इंधन दरवाढीविरोधात संताप व्यक्त होत असताना नाशिकमध्येही इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. ग्राहकांना पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसह सुमारे २१ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन करीत भारतबंद पुकारल्यानंतरही इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ सुरूच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून व संघटनांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना सामान्य नाशिककरांकडूनही सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलNashikनाशिकPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल