शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:57 IST

नाशिकमध्ये हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज घडली.

नाशिकच्या अंजनेरी येथे डोंगरावर हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात ८ ते १० भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या भाविकांवर अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले. भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (१२ एप्रिल २०२५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या एकाने मंदिराच्या पायऱ्यांवर शंखध्वनी केला. या आवाजाने परिसरात असलेली माकडे सैरभैर पळाली. त्यावेळी माकडांचा आसपासच्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीनिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या अंजनेरी येथे भाविकांची आज मोठी गर्दी उसळली. सकाळी मंदिराच्या पायऱ्यांवरील मार्गावर कोणीतरी शंखध्वनी केला, ज्याच्या आवाजाने माकडे इकडे तिकडे पळू लागली. त्यावेळी माकडांचा जवळ झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्या. यानंतर मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला.

मधमाशांनी अचानक हल्ल्या केल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला. स्वत:ला मधमाशांपासून वाचवण्यासाठी अनेकजण डोंगरावर इतरत्र आसरा घेऊ लागले. या हल्ल्यात एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.  जखमी झालेल्या भाविकांना डोंगरावरून खाली उतरवण्यात आले. तसेच त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र