शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

Nashik Crime: अथर्व दुसऱ्या राज्यात, परदेशात जाऊन करायचा 'रंगेल चाळे'; पत्नी भक्तीला पाठवायचा 'ते' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:08 IST

Nashik Crime Latest news: नाशिकमध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासारखीच घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nashik crime Bhakti Gujarathi: वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच नाशिकमध्ये अशीच घटना नाशिकमध्ये घडली आहे. ३३ वर्षीय भक्ती अथर्व गुजराथी या विवाहितेने पती आणि सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवले. भक्तीनेही घरात गळफास घेतला. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या सिरीन मेडोज या उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी अथर्व गुजराथी, मनीलाल गुजराथी, मधुरा गुजराथी या तिघांना अटक केली आहे. 

बालपणापासूनचे मैत्री, नंतर प्रेम

मयत भक्ती आणि अथर्व हे लहानपणापासून ओळखत होते. दोघेही येवला शहरात मोठे झाले. भक्ती आणि अथर्व यांची घरेदेखील जवळजवळ होती. 

वाचा >>"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट

ते दोघेही शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. ते चांगले मित्र बनले आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी २०१७ साली लग्न केलं. पण, त्यांचा हा प्रेमविवाह अथर्वच्या आईवडिलांना खटकला होता. त्यामुळे सुनेसोबत त्यांचेही पटत नव्हते आणि सतत वाद होत राहायचे, असे तपासातून समोर आले.

दुसऱ्या राज्यात, परदेशात अथर्वचे रंगेल चाळे

अथर्व हा व्यवसायानिमित्ताने बाहेरील राज्यात व देशांत दौऱ्यावर गेल्यानंतर तेथे 'रंगेल'चाळे करायचा. अथर्व गुजराथी याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याने बँकॉकमधील पटायामध्ये संबंध ठेवण्याच्या 'कृत्या'बाबत जेव्हा भक्तीला समजले, तेव्हा तिला धक्काच बसला. 

त्यानंतर त्या दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. अथर्व हा तिला पर स्त्रियांसोबत घालवलेल्या क्षणांची छायाचित्रे काढून पाठवत मानसिक त्रास देत होता. ते फोटो काढून पत्नीला पाठवत होता, अशी माहितीही समोर आली आहे. 

अथर्व आणि सासू सासऱ्यांबद्दल भक्तीने कुणाला सांगितले?

भक्तीच्या मृत्यू प्रकरणाबद्दल माहिती देताना नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे म्हणाल्या, 'गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. भक्त्तीने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाबाबत तिचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणींला मेसेजेस केले आहेत. त्यांचाही जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.'

भक्तीचा मुलगा आईच्या प्रेमाला झाला पारखा

अथर्व आणि सासू-सासऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या छळामुळे भक्ती ही माहेरी म्हणजे येवल्याला निघून गेली होती. तिने सगळी आपबिती आई-वडील व भावाला सांगितली होती. भक्तीला लहान मुलगादेखील आहे. 

भक्ती येवल्याला आल्यानंतर पती अथर्व हा तिच्या घरी गेला. मी तिला त्रास देणार नाही, असे त्याने भक्तीच्या आई-वडिलांकडे सांगितले आणि तिला पुन्हा नाशिकला घेऊन गेला होता. पण, त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही आणि शेवटी भक्तीने आयुष्य संपवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक