नाशिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:45 IST2021-03-11T23:20:04+5:302021-03-12T00:45:49+5:30

नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १६ वर्षांखालील स्पर्धेचे अजिंक्यपद नाशिक क्रिकेट अकादमीने पटकाविले.

Nashik Cricket Academy wins | नाशिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद

नाशिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद

ठळक मुद्देहकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शर्विनचे नाबाद शतक

नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १६ वर्षांखालील स्पर्धेचे अजिंक्यपद नाशिक क्रिकेट अकादमीने पटकाविले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या २२ यार्ड्स क्रिकेट क्लबला २०५ धावांत बाद करून, नाशिक क्रिकेट अकादमीने कर्णधार शर्विन किसवेच्या नाबाद शतकाच्या जोरावर २०६ धावांचा यशस्वी पाठलाग करून २२ यार्ड्स संघावर ४ गडी राखून विजय मिळविला.

संक्षिप्त धावफलक व निकाल :

अंतिम सामना : २२ यार्ड्स क्रिकेट क्लब सर्वबाद २०५ - ओम कोकणे ५१, मोहम्मद साकीब ४२, अश्विन हौसारे नाबाद ३७. प्रतीक तिवारी व गौरव कुलकर्णी प्रत्येकी ३, तर निखिल खत्री, साहिल पारख, कार्तिकेश चौरे व अनिकेत गायकवाड प्रत्येकी १ बळी वि. नाशिक क्रिकेट अकादमी ६ बाद २०६ - शर्विन किसवे नाबाद १०७, आर्यन पालकर २६. कृष्णा बच्छाव २, तर देवांश पाटील, साई निकम व शौनक साठे प्रत्येकी १ बळी. नाशिक क्रिकेट अकादमी ४ गडी राखून विजयी.
 

Web Title: Nashik Cricket Academy wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.