शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहर रेल्वे तिकीट कार्यालय त्वरीत सुरू करावे ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:40 IST

नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

ठळक मुद्देनाशिकरोड येथे जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय रेल्वेचे तिकीट बुकींग ऑफिस पुन्हा सुरू करा महाराष्ट्र चेंबरची रेल्वे प्रशासनाकड़े मागणी

नाशिक : लॉकडाऊननंर हळुहळू  नियमांमध्ये शिथिलता दिली जात असलाना  प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक शहरातील तिकीट आरक्षण कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नाशिकरोडला जावे लागू नये म्हणून नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेने तिकीट आरक्षण कार्यालय सुरु केलेले आहे.  परंतु  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे आरक्षण कार्यालय २३ मार्च २०२० पासून बंद आहे. परंतु आता रेल्वेने २०० गाड्याही सुरु केल्या असून त्या गाड्यांचे तिकीट आरक्षण तसेच रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचा परतावा देण्याचे काम सुरु झाले आहे.  नाशिकच्या प्रवाशांना याकरीता १२ किलोमीटर दूर असलेल्या नाशिकरोड स्टेशनवर त्यासाठी जावे लागत आहे. मुळातच वेळेवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची गर्दी रेल्वे स्टेशनवर असते.  नाशिक शहर तिकीट कार्यालयातून दररोज जवळपास एक हजार तिकीट विक्री होते व अंदाजे २५ कोटींचा महसूल रेल्वेला प्राप्त होतो. त्यामुळे नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य  भावेश मानेक यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकticketतिकिटreservationआरक्षण