शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहराला हवे वाढीव पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 16:10 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाशी पाणीपुरवठ्याचा करार करताना शिर्डी नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव पाणी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातील मृत साठा वगळून पाणी आरक्षण मिळावे यासाठीदेखील चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देजलसंपत्ती प्राधीकरणाचे निकष अमान्यजलसंपदा विभागाशी चर्चा करणार

नाशिक : महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाशी पाणीपुरवठ्याचा करार करताना शिर्डी नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव पाणी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातील मृत साठा वगळून पाणी आरक्षण मिळावे यासाठीदेखील चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ही माहिती दिली.

२०११ पासून या दोन्ही विभागात करार करण्यात आला नव्हता. आता वार्षिक पाणीपुरवठा करार करण्यात येणार असला तरी दोन वर्षांपूर्वी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निकष बदललेले आहेत. त्यानुसार ज्या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कमी असेल त्या महापालिकेला १३५ लिटर्स दरडाई पाणीपुरवठा या हिशेबाने पाणी आरक्षण मंजूर असून, त्यापेक्षा अधिक पाणी घेतल्यास दीडपट आणि दुप्पट दर आकारण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेची लोकसंख्या ही वीस लाखांपर्यंत आहे. त्यामुळे महापालिकेला सध्या दीडशे लिटर्स दरडोई होणारा पुरवठा कमी करावा लागणार आहे.

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निकष काहीही ठरवले असले तरी त्यांच्याकडे अपील केल्यास त्यात सुुधारणा होऊ शकते.सर्व नगरपालिकांना एकसारखा निकष लागू केल्यानंतर शिर्डी नगरपालिकेने प्राधिकरणाकडे अपील केले होते. जगभरातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक येतात. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार त्यांचे अपील मान्य करण्यात आले. नाशिकमध्येदेखील कामगार, भाविक आणि पर्यटकांची संख्या अधिक असल्याने तरंगती लोकसंख्या अधिक असल्याने पाणी वाढवून मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे तशी मागणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीDamधरण