नाशिक शहरात ४४.५० टक्के पाण्याचा वापर होतो फुकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:44 PM2018-01-19T19:44:38+5:302018-01-19T19:47:31+5:30

पाणी लेखापरीक्षण : शहरात होते १४.५० टक्के पाणीगळती

 Nashik City gets 44.50 percent of the water freight! | नाशिक शहरात ४४.५० टक्के पाण्याचा वापर होतो फुकटात!

नाशिक शहरात ४४.५० टक्के पाण्याचा वापर होतो फुकटात!

googlenewsNext
ठळक मुद्देकेवळ ४५ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरीता तीन टप्प्यात सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाची कामे सुचविण्यात आली आहेत

नाशिक - महापालिकेने नियुक्त केलेल्या मे. एन. जे. एस. इंजिनिअर्स (इंडिया) प्रा. लिमिटेड या संस्थेने तयार केलेल्या पाणी लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार, तब्बल ४४.५० टक्के पाण्याचा वापर फुकटात होत असून त्याचा कुठेही हिशेब नाही. केवळ ४५ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास आले आहे. सदर हिशेबबाह्य पाण्याचा वापर २० टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्टय महापालिकेला देण्यात आले आहे. दरम्यान, थेट गळती १४.५० टक्के आढळून आली असून पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी ६०० कोटी रुपयांची विविध कामे तीन टप्प्यात करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
संबंधित संस्थेने पाणी लेखा परीक्षणाचा प्रारुप अहवाल आयुक्त अभिषेक कृष्ण यांना सादर केला. या अहवालानुसार, थेट गळतीचे प्रमाण १४.५० टक्के इतकी आढळून आली आहे. ट्रिटमेंट प्लांटवर ३.५० ते ४ टक्के पाणीगळती असून महापालिकेच्या मालकीच्या इमारती, उद्याने, स्टॅण्डपोस्टद्वारे ३ टक्के पाणीवापर होतो. केवळ ४५ टक्केच पाण्याचे बिलिंग होते. हिशेबबाह्य पाण्याची टक्केवारी ४४.५० टक्के इतकी आहे. ज्यापासून महापालिकेला कसलेही उत्पन्न मिळत नाही. पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरीता तीन टप्प्यात सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाची कामे सुचविण्यात आली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात तीन ते पाच वर्षांत पाईपलाइनमधील व्हॉल्व बदलणे, ट्रीटमेंट प्लांटवरील गळती बंद करणे, जलशुद्धिकरण केंद्रांवरील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, मीटरींग करणे व स्काडा मीटर बसविणे, जुन्या पाईपलाइन बदलणे यांचा समावेश आहे. दुसºया टप्प्यात जेथे जास्त पाणीगळती आहे, तेथे लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी २४ तास पाणीपुरवठा करणे, अतिरिक्त जलकुंभांची निर्मिती करणे, वितरणवाहिनीत सुधारणा करणे तर तिस-या टप्प्यात उर्वरित भागात २४ तास पाणीपुरवठ्याचे नियोजन सुचविण्यात आले आहे. या कामांमधील मीटरींग करणे, स्काडा मीटर बसविणे, जुन्या पाईपलाइन बदलणे आदी कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत केली जाणार असल्याने अहवाल कंपनीला सादर करण्यात आला असून कंपनीकडूनप्राप्त माहितीनंतर फेब्रुवारी २०१८ अखेर संस्थेकडून अंतिम अहवाल महापालिकेला सादर केला जाणार आहे.
...असे झाले पाणी लेखापरीक्षण
पाणी लेखापरीक्षण करताना संस्थेने २१०० कि.मी. पाईपलाईनचे नेटवर्क ग्लोबल इन्फर्मेशन सिस्टमवर आणले. शहरातील ६ झोनमधील प्रत्येकी दोन जलकुंभांची निवड करण्यात आली. १२ जलकुंभांच्या कमांड एरियात असलेल्या नळजोडण्यांपैकी २० टक्के नळजोडण्यांची माहिती घेण्यात आली. त्यात ग्राहकांचाही सर्वे करण्यात आला. प्रामुख्याने, घरात किती माणसे आहेत, किती व्यासाची पाईपलाइन आहे. घरात किती माणसे आहेत. पाण्याचा दाब किती. पाण्याचा दर्जा व गुणवत्ता कशी आहे. त्याचा अंदाज घेत संपूर्ण शहराचा अंदाज ठरविण्यात आला. सर्वे करण्यात आला त्यावेळी महापालिकेमार्फत धरणातून प्रतिदिन ४१० दसलक्षलिटर्स पाण्याची उचल केली जात होती.

Web Title:  Nashik City gets 44.50 percent of the water freight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.