स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेसाठी नाशिक पात्र
By Admin | Updated: August 28, 2015 00:21 IST2015-08-28T00:21:42+5:302015-08-28T00:21:54+5:30
केंद्राकडून समावेश : मार्चअखेर लागणार अंतिम यादी

स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेसाठी नाशिक पात्र
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात समावेशासाठी देशभरातून प्राप्त झालेल्या शहरांच्या प्रस्तावांतून छाननीनंतर केंद्र सरकारने ९८ शहरांची यादी निश्चित केली असून, महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या नाशिकसह दहाही शहरांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या समावेशामुळे आता नाशिकला पुढील टप्प्यात स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे, तर फेब्रुवारी-मार्च महिन्यात केंद्राकडून अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने राज्यातील नाशिकसह दहा शहरांची निवड करत त्यांची नावे केंद्राकडे पाठविली होती. नाशिकसंबंधी प्रस्ताव आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उच्चाधिकार समितीपुढे सादर केला असता नाशिकचे गुणांकन शंभरपैकी ८५ नोंदविले गेले आहे.