शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

नाशिकमध्ये अस्मिता योजनेच्या लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 18:20 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली असून या योजेच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला नाशिक जिल्ह्यातही सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळांमध्ये किशोरवयीनसाठी अस्मिता योजना11 ते 19 वयोगटातील लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला सुरुवातग्रामीण भागात मुलींना मिळणार माफक दरात सॅनिटरी नॅपकिन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली असून या योजेच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला नाशिक जिल्ह्यातही सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वर्ष वयोगटातील मुलींची नोंदणी नजीकच्या ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व उच्च प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत. ही नोंदणी प्रक्रीय 8 मार्चपूर्वीच पूर्ण करून महिला दिनाचे औचित्यसाधत विद्यार्थीनींना अस्मिता अंतर्गत सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचे ग्रामविकास विभागाचे लक्ष होते. परंतु, नाशिक जिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थिनींची नोंदणी प्रक्रियाच महिला दिन उलटल्यानंतर मुहुर्त मिळाला अाहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्यध्यापकांना लेखी अादेश काढले असून अखेर नाशिक जिल्ह्यातही लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला सरुवात झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेत 11 ते 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींच्या नावासह इयत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, छायाचित्र  आदी माहिती मुख्याध्यापकांनी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर देऊन केंद्रचालकाकडून नोंदणीची प्रक्रि या पूर्ण करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोरवयीन मुली पात्र आहेत. ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत ग्रामविकास विभागातर्फे 1 मार्च रोजी अस्मिता योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुलींना अस्मिता कार्ड व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीसाठी अस्मिता योजनेअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेपासून खासगी शाळांमधील किशोरवयीन मुली वंचित राहणार आहेत. त्यामुळे खासगी माध्यमाच्या शाळेतील मुलींनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या ही मोठय़ा प्रमाणात आहे.

 पाच रुपयांत मिळणार आठ पॅडअस्मिता योजनेंतर्गत अस्मिता कार्ड व 8 पॅडचे एक पाकीट मुलींना 5 रु पये या माफक दरात दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींना लाभ देण्याबाबत मुलींची नोंदणीप्रक्रि या महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात सुरू होणो अपेक्षित असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महिला दिन उलटून गेल्यानंतर 11 ते 19 वयोगटातील मुलींची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

टॅग्स :educationशैक्षणिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य