शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नाशिक : नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव !

By धनंजय रिसोडकर | Updated: April 8, 2024 16:32 IST

विद्यमान आमदारांसह संघटनाप्रमुखांपैकी कुणाचेही नाव राहू शकते आघाडीवर

नाशिक : नाशिकच्या जागेबाबतचा उमेदवार निश्चितीचा तिढा म्हणजे महायुतीसाठीचा सर्वांत कठीण पेपर ठरत आहे. त्यामुळे या कठीण पेपरचे उत्तर सोडविण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या विद्यमान आमदारांपैकीच एक किंवा संघटनांच्या जिल्हा प्रमुखांची नावे चर्चेत आली आहेत. अशा परिस्थितीत महायुतीकडून अनपेक्षित नावाचा पत्ता फेकून महाआघाडीच्या उमेदवाराला चकीत करण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत.

नाशिकच्या जागेसाठी आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊन आता जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवार घोषणेचा खेळ सुरू असताना वाजे यांच्या प्रचाराला अधिकाधिक वेळ मिळणे ही बाब महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीने सर्वाधिक त्रासदायक ठरू शकते. प्रचारासाठी आता केवळ ४० दिवसांचा कालावधी उरलेला असूनही महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही राहिले असल्याने उमेदवारीचा तिढा नव्हे गुंता झाला असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यातील काटाकाटी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी नव्या उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. तसेच, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीने नवे सर्वेक्षण सुरू केले असून, यात नव्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात शिंदेसेनेकडूनच आता जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव, तर भाजपकडून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्यासह नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांचे नावदेखील चर्चेत येऊ लागले आहे. तसेच, वाजे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुढे येऊ लागले आहे. त्यातही आता महायुतीतील नावांपैकी सर्वाधिक सक्षम उमेदवाराबाबत चाचपणी सुरू असून गुढीपाडवा किंवा त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंतिम नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabhaलोकसभाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४