नाशिक @ ९.५, गारवा कायम
By Admin | Updated: January 2, 2017 01:26 IST2017-01-02T01:25:30+5:302017-01-02T01:26:11+5:30
नाशिक @ ९.५, गारवा कायम

नाशिक @ ९.५, गारवा कायम
नाशिक : तीन ते चार दिवसांपूर्वी शहराचे किमान तपमान सर्वांत कमी ८.३ अंशावर घसरले होते, तर मंगळवारी (दि.२७) पारा अचानकपणे पुन्हा ८.४ वर आल्याने थंडीचा कडाका कायमच होता. घसरलेल्या तपमानाचा पारा काहीअंशी वर सरकत असून, थंडीचा कडाका कमी होत असल्याचे जाणवत असले तरी हवेमध्ये गारवा कायम असल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहे.
थर्टीफर्स्टच्या रात्री किमान तपमान ८.९ अंश इतके नोंदविले गेले तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारी ९.५ इतक्या तपमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे. एकूणच नोंदविलेल्या तपमानाच्या आकडेवारीवरुन किमान तपमानाचा पारा सध्या चढता आहे.