नाशिक @३६ अंश

By Admin | Updated: February 28, 2017 02:06 IST2017-02-28T02:05:40+5:302017-02-28T02:06:38+5:30

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी (दि.२७) तपमानाचा पारा ३६.१ अंशावर स्थिरावला. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी ३६.६ अंश कमाल तपमान नोंदविण्यात आले होते.

Nashik @ 36 degrees | नाशिक @३६ अंश

नाशिक @३६ अंश

 नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी (दि.२७) तपमानाचा पारा ३६.१ अंशावर स्थिरावला. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी ३६.६ अंश कमाल तपमान नोंदविण्यात आले होते.
थंड व आल्हाददायक वातावरण असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख जरी असली तरी काळानुरूप ही ओळख पुसली जात आहे. वाढते शहरीकरण आणि नागरिकांची बदलती जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. शहराच्या तपमानात दिवसेंदिवस वाढ होत असून ‘हॉट सिटी’चा अनुभव नाशिककरांना सध्या येत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहराचे कमाल तपमान ३६ अंशांवर पोहचले आहे. या महिन्यात सोमवारी नोंदविण्यात आलेले तपमान उच्चांकी असून, नाशिककर घामाघूम झाले आहे. पंधरवड्यापासून जरी शहराचे कमाल तपमान वाढत असले तरी संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवत होता; मात्र आठवडाभरापासून रात्रीदेखील नाशिककरांना अल्हाददायक वातावरणात झोप घेण्यासाठी पंख्याची गरज भासू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात कमाल तपमानाचा पारा ३६ अंशापर्यंत सरकल्याने पुढील तीन महिने शहराच्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू शक ते असा अंदाज वर्तविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik @ 36 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.