शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

सामाजिक बांधिलकी जोपासा : बोधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:40 IST

नाशिक : संतश्रेष्ठ नामदेव यांनी आयुष्यभर भागवत धर्म तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार व प्रसार केला़ स्वत:करिता केलेले कार्य हे स्वत: पुरते मर्यादित राहते, मात्र तेच कार्य जर समाजासाठी केले तर अमर राहते, मग तो कोणाताही समाज असो़ प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगड येथील उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी केले़

ठळक मुद्दे नामदेव समाजोन्नती परिषद : मान्यवरांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव

नाशिक : संतश्रेष्ठ नामदेव यांनी आयुष्यभर भागवत धर्म तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार व प्रसार केला़ स्वत:करिता केलेले कार्य हे स्वत: पुरते मर्यादित राहते, मात्र तेच कार्य जर समाजासाठी केले तर अमर राहते, मग तो कोणाताही समाज असो़ प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगड येथील उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी केले़ नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे तूपसाखरे लॉन्स येथे शनिवारी (दि़३०) आयोजित समाजातील मान्यवरांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते़

बोधे पुढे म्हणाले की, यश मिळाल्यानंतर थांबू नका कारण यशानंतर अपयश मिळाले तर टीकेसाठी लोक टपूनच बसलेले असतात़ यश मिळाल्यानंतर आई-वडील, समाज यांना विसरू नका, त्यांना कष्टाने सांभाळ करण्याबाबत मार्गदर्शन केले़ याबरोबरच समाजातील धनिकांनी गरीब व होतकरूसांठी ठराविक रक्कम जमा करून मदत करण्याचे आवाहन केले़ कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड़ सुधीर पिसे यांनी परिषदेचे कार्य व विविध उपक्रमांची माहिती दिली़ यावेळी सीआयडीत निवड झालेले मयूर चांडोले व आयएएस सुरज गणोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला़

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे बाळासाहेब खर्डे, बापूसाहेब वैद्य, मधुकर लचके, सुरज गणोरे, पुरुषोत्तम मुळे, सम्राज्ञी रहाणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी वैदेही खर्डे, सिद्धा बोरकर, साक्षी बेदडे, तनिशा खर्डे, सौरभ गुजर, श्रेया टापसे, मयूर कल्याणकर, अनुजा रहाणे, राधिका गुजर, ऐश्वर्या नेवासकर, मल्लिका राहणे, वैष्णवी नेवासकर, संस्कार नानेगावकर यांचा सत्कार करण्यात आला़ क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनुष्का आंबेकर, स्वराली मुळे, श्रृतकीर्ती चुंबळे, वैष्णवी कोडीलकर यांचाही सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर परिषदेचे उपाध्यक्ष संजीव तूपसाखरे, राजन उरुणकर, चंद्रकांत सारंगधर, डॉ. अजय फुटाणे, संजय नेवासकर, प्रा. एल. जी. दाभोळे, अनंत वायचळ आदी मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक