महिला शिक्षकांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST2021-04-07T04:15:17+5:302021-04-07T04:15:17+5:30

शाळास्तरावर विविध नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत ठेवले अशा उल्लेखनीय कामगिरीतुन विजया सुरेश लिलके, नलिनी आहिरे, अनुराधा ...

Nari Shakti Award for Women Teachers | महिला शिक्षकांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत

महिला शिक्षकांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत

शाळास्तरावर विविध नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत ठेवले अशा उल्लेखनीय कामगिरीतुन विजया सुरेश लिलके, नलिनी आहिरे, अनुराधा तारगे, संध्या देवरे, मनिषा साळवे., वैशाली भामरे, विजया चतुर, माधुरी पाटील, स्वाती मुसळे यांना सर फाऊंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र वूमन टीचर फोरमच्या वतीने जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार ऑनलाईन वितरण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शिक्षण सह उपसंचालक पुष्पावती पाटील, मनपा उपायुक्त अर्चना तांबे, प्राचार्य रत्नप्रभा भालेराव, मनपा प्रशासनाधिकारी सुनिता धनगर उपस्थित होते. प्रस्ताविक सोपान खैरनार यांनी तर सूत्रसंचालन वैशाली सूर्यवंशी यांनी केले. यावेळी कुंदा बच्छाव, हंसराज देसाई, आनंद आनेमवाड, नलिनी आहिरे मनोगत व्यक्त केले.

Web Title: Nari Shakti Award for Women Teachers