झिरवाळ म्हणतात, मग मला मुख्यमंत्री करा! जर-तरच्या प्रश्नांवर मी काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 08:38 AM2023-05-09T08:38:55+5:302023-05-09T08:41:08+5:30

राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या आठ दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो.

narhari Jhirwal says, then make me Chief Minister! What do I say about the if-then questions? | झिरवाळ म्हणतात, मग मला मुख्यमंत्री करा! जर-तरच्या प्रश्नांवर मी काय बोलणार?

झिरवाळ म्हणतात, मग मला मुख्यमंत्री करा! जर-तरच्या प्रश्नांवर मी काय बोलणार?

googlenewsNext

नाशिक : राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या आठ दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. पण, लोक आताच प्रश्न विचारू लागले आहेत पुढे काय होणार?  सरकार पडले तर? अशा जर-तरच्या प्रश्नांवर मी काय बोलणार? मी तर म्हणेन मला मुख्यमंत्री करा, असे विधान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.  मागे एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ‘आपणाला मुख्यमंत्री होणे आताही आवडेल,’ असे माध्यमांना सांगितले तेव्हा माध्यमांनी त्यावरच फोकस केल्याची आठवण करून देताना आता माझ्या विधानाबाबत असे करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. 

Cyclone Mocha : 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! पश्चिम बंगाल आणि ओडिशाला दिला हाय अलर्ट 

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर माध्यमांनी सोमवारी नाशिकमध्ये झिरवाळ यांना विचारले असता त्यांनी न्यायालयाचा निकाल सर्वोच्च असल्याचे म्हटले. आमदार अपात्रतेबाबत आपण घटनेनुसारच पत्र दिले असून, आमदार अपात्र ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दादा भाजपात जाणार नव्हतेच... 

शरद पवार यांच्या राजीनाम्यापूर्वी एक महिना आधीच अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु, दादा कधीही भाजपात जाणार नव्हते. आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ तर दादा जातील ना, असेही झिरवाळ म्हणाले. 

Web Title: narhari Jhirwal says, then make me Chief Minister! What do I say about the if-then questions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.