नराधम पित्याला आठ दिवस कोठडी
By Admin | Updated: May 29, 2014 00:24 IST2014-05-29T00:21:21+5:302014-05-29T00:24:35+5:30
नाशिक - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करणारा संशयित इम्रान शब्बीर गौरी यास न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपजवळ राहणार्या इम्रान शब्बीर गौरी (३८) याने स्वत:च्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फ ोटो व छायाचित्रण केले़ हे फ ोटो फे सबुकवर टाकण्याची धमकी देत गेल्या पंधरा महिन्यांपासून तो लैंगिक अत्याचार करीत होता़ या प्रकारास विरोध करणार्या मुलीला व तिच्या आईलाही त्याने ठार मारण्याची धमकी दिली़ दरम्यान या प्रकरणी मंगळवारी भद्रकाली पोलिसांत दिलेल्या फि र्यादीनुसार इम्रान गौरी यास ताब्यात घेऊन त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यास आज न्यायालयात हजर केले असता ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल

नराधम पित्याला आठ दिवस कोठडी
नाशिक - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करणारा संशयित इम्रान शब्बीर गौरी यास न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपजवळ राहणार्या इम्रान शब्बीर गौरी (३८) याने स्वत:च्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फ ोटो व छायाचित्रण केले़ हे फ ोटो फे सबुकवर टाकण्याची धमकी देत गेल्या पंधरा महिन्यांपासून तो लैंगिक अत्याचार करीत होता़ या प्रकारास विरोध करणार्या मुलीला व तिच्या आईलाही त्याने ठार मारण्याची धमकी दिली़ दरम्यान या प्रकरणी मंगळवारी भद्रकाली पोलिसांत दिलेल्या फि र्यादीनुसार इम्रान गौरी यास ताब्यात घेऊन त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यास आज न्यायालयात हजर केले असता ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले़(प्रतिनिधी)