शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नार-पार व गिरणा-  अंबिका नदीजोड फेरप्रकल्प अहवाल अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:52 IST

नाशिक : नार-पार व गिरणा-  अंबिका नद्याजोेड योजनेत जुना प्रकल्प अहवाल गुंडाळून नवीन अहवाल नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे  तो आम्ही फेटाळला असून, सर्वांना मान्य असा सर्वसमावेशक अहवालचमान्य करावा या मागणीसाठी जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन  यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नद्याजोडमंत्री नितीन गडकरी ...

नाशिक : नार-पार व गिरणा-  अंबिका नद्याजोेड योजनेत जुना प्रकल्प अहवाल गुंडाळून नवीन अहवाल नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे  तो आम्ही फेटाळला असून, सर्वांना मान्य असा सर्वसमावेशक अहवालचमान्य करावा या मागणीसाठी जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन  यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नद्याजोडमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या नवीन नदीजोड योजनेतून महाराष्टÑाला ८८७ दलघमी पाणी मिळणार आहे, तर गुजरातला १०२९ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. राज्याच्या वाट्याचे ८८७ दलघमी पाणी संपूर्ण राज्यासाठीच राखीव ठेवावे अशी भूमिका आम्ही घेणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. एकेका थेंबासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू, असेही त्यांनी सांगितले. जुना प्रकल्प अहवाल मांजरपाडा, चणकापूर, देवळा, उमराणे, मनमाड, नांदगावपासून सोयगाव (औरंगाबाद) पर्यंत होता. तसेच गिरणा उजव्या कालव्यातून तो चणकापूर, ठेंगोंडा, सटाणामार्गे मालेगावपर्यंत पाणी येणार होते. नवीन प्रकल्प अहवालानुसार चणकापूरनंतर हे पाणी थेट मालेगावला जाणार आहे. त्यामुळे गिरणा व गोेदावरी या तुटीच्या खोºयावर तसेच येवला, नांदगाव, चांदवड भागावर अन्यायकारक आहे. त्यामुळे हा नवीन प्रकल्प मंजूर न करण्यासाठी आता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकजूट करणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, कुणाल पाटील, दीपिका चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे आदी उपस्थित होते.व्यवहार्यता तपासणारराज्याचे पाणी राज्यालाच राहणार असून, कोणीही जुना अहवाल फेटाळून नवीन अहवाल तयार करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. नवीन पीएफआर तयार करण्याचे काम तीन एजन्सीला देण्यात आले होते. त्या तीन एजन्सीने वेगवेगळे प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. त्यातील व्यवहार्य अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या असल्याचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकministerमंत्री