शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

नाशिकचा निरोप घेताना नांगरे पाटील भावुक; अंत:करण जड असल्याची व्यक्त केली भावना

By अझहर शेख | Published: September 04, 2020 9:58 PM

नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली.

ठळक मुद्देशहराला साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरजनेटिझन्सकडून ध्वनिफित प्रचंड व्हायरल

नाशिक : नाशिकसारख्या प्रगत सुधारणावादी शहराची सेवा करण्याची मला केवळ दीड वर्षे संधी लाभली. धार्मिक, पौराणिक वारसा असलेल्या या शहराची शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. येथील माती, माणसे, निसर्ग, आल्हाददायक वातावणामुळे नाशिकच्या प्रेमात कोणताही माणूस पडतोच, अशा चांगल्या शहराला सोडून जाताना अंत:करण निश्चित जड आहे. या शहरासोबतचा ऋणानुबंध नेहमीच कायम राहील. नाशिककर चांगल्या कामांना साथ देणारे असून, कायद्याचे पालन करणारी जनता या शहरात आहे, अशा भावना शुक्रवारी मावळते आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका ध्वनीफितीद्वारे व्यक्त केली. शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर त्यांची ही ध्वनीफित चांगलीच गाजत आहेत. नेटिझन्सकडून ध्वनिफित प्रचंड व्हायरल केली जात आहे.

राज्य शासनाच्या गृहविभागाकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली.
४१आरोपींना मोक्का; १५८ तडीपारशहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी या दीड वर्षांमध्ये ४१ सराईत गुन्हेगारांच्या संघटित गुन्हेगारांची पार्श्वभूमी बघता मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. तसेच १५८ गुन्हेगारांना शहर आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आल्याचे नांगरे पाटील म्हणाले. शहरात खूनासारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकारात ३७ टक्क्यांनी घट झाल्याचा दावाही त्यांनी केला. निर्भया पथकांचे सक्षमीकरण, डिकॉय आॅपरेशन, पोलीस ठाण्यांची चाचणी परिक्षा, सीमावर्ती नाकाबंदी,२४ तास कार्यान्वित कोरोना मदत कक्ष असे विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली. या उपक्रमांमुळे शहराच्या पोलिसींगमध्ये कसा सुधार येण्यास मदत झाली हेदेखील त्यांनी पटवून सांगितले. यावेळी त्यांनी मुथूट फायनान्स कार्यालयावर झालेल्या सशस्त्र दरोडा व त्याचा यशस्वी तपासाबाबतची माहिती दिली.
शहराला साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरजपोलिसांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे देखील २४ तास कार्यरत राहणारे एकप्रकारचे पोलीसच आहे. शहराच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अजून साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरज आहे. शहरातील महत्त्वाचा भाग सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीखाली आला असून साडेपाचशे कॅमेरे शहरात कार्यान्वित झाले आहे. तसेच महत्त्वाच्या पोलीस चौक्यांना आलेले बकालस्वरुप बदलून २० चौक्यांचे रुप सध्या पालटल्याचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMumbai policeमुंबई पोलीस