शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

नांदूरमधमेश्वर, दारणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:00 PM

इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे तालुक्यातील दारणा धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे इगतपुरीत संततधार : भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांत समाधान; सिन्नरला देवनदीला पूर

घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे तालुक्यातील दारणा धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे.या संततधारेमुळे ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, गुरुवारी (दि. १३) ७४०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. दिवसभरात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर २३०५ मिमी विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे. वार्षिक सरासरीच्या ९०.०८ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ७८१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, पाऊस असाच सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात पाणी साचून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून, धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. धरणांंच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरणे भरली असली तरी सद्यस्थितीत सुरू असलेला पाऊस असाच सुरू राहिला तर फुगवट्यात मोठी वाढ होईल. या पावसाचा पिकांना चांगला फायदा होणार असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.- सुरेश जाचक,शाखा अभियंता, दारणा धरणनिफाड तालुक्यात पावसाने पिकांना संजीवनीचांदोरी : नाशिक शहरासह ग्रामीण भागात सलग तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.शुक्र वारी सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती, तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाने चांगली सलामी दिली होती. त्यानंतर जवळपास दीड महिना दडी मारून बसलेले पाऊस आता चांगलाच बरसू लागला आहे. या झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. तसेच जलाशयात व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने यंदा प्रथमच दारणा व गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असताना नांदूरमधमेश्वर धरणातून गुरु वारी रात्रीपर्यंत १६,४६५ क्यूसेक विसर्ग करण्यात आला.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस