नांदूरमधमेश्वर, दारणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:00 PM2020-08-14T22:00:19+5:302020-08-15T00:15:52+5:30

इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे तालुक्यातील दारणा धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे.

Nandurmadhameshwar, Increase in water storage of Darna | नांदूरमधमेश्वर, दारणाच्या जलसाठ्यात वाढ

निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणातून करण्यात आलेला विसर्ग.

Next
ठळक मुद्दे इगतपुरीत संततधार : भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांत समाधान; सिन्नरला देवनदीला पूर

घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे तालुक्यातील दारणा धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे.
या संततधारेमुळे ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, गुरुवारी (दि. १३) ७४०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. दिवसभरात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर २३०५ मिमी विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे. वार्षिक सरासरीच्या ९०.०८ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ७८१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, पाऊस असाच सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात पाणी साचून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून, धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. धरणांंच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरणे भरली असली तरी सद्यस्थितीत सुरू असलेला पाऊस असाच सुरू राहिला तर फुगवट्यात मोठी वाढ होईल. या पावसाचा पिकांना चांगला फायदा होणार असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.
- सुरेश जाचक,
शाखा अभियंता, दारणा धरण

निफाड तालुक्यात पावसाने पिकांना संजीवनी
चांदोरी : नाशिक शहरासह ग्रामीण भागात सलग तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शुक्र वारी सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती, तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाने चांगली सलामी दिली होती. त्यानंतर जवळपास दीड महिना दडी मारून बसलेले पाऊस आता चांगलाच बरसू लागला आहे. या झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. तसेच जलाशयात व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने यंदा प्रथमच दारणा व गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असताना नांदूरमधमेश्वर धरणातून गुरु वारी रात्रीपर्यंत १६,४६५ क्यूसेक विसर्ग करण्यात आला.

Web Title: Nandurmadhameshwar, Increase in water storage of Darna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.