नांदूरमधमेश्वरला विहिरीत बिबट्याची मादी मृतावस्थेत

By Admin | Updated: August 8, 2014 01:35 IST2014-08-07T22:37:45+5:302014-08-08T01:35:20+5:30

नांदूरमधमेश्वरला विहिरीत बिबट्याची मादी मृतावस्थेत

Nanduramdhameshwar in the well of a leopard's female dead | नांदूरमधमेश्वरला विहिरीत बिबट्याची मादी मृतावस्थेत

नांदूरमधमेश्वरला विहिरीत बिबट्याची मादी मृतावस्थेत

 

निफाड : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नांदूरमधमेश्वर परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याचा भागवत रामकृष्ण शिंदे यांच्या विहिरीत पडून मृत्यू झाला. येवला वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन या बिबट्याला वर काढले.
नांदूरमधमेश्वर-सारोळे रस्त्यावर गुरुवारी दुपारी बिबट्याची मादी भागवत शिंदे यांच्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शिंदे यांच्या शेतीतील ही विहीर जमिनीलगत असल्याने बिबट्याच्या मादीच्या लक्षात न आल्याने ती विहिरीत पडली असावी, असा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विहिरीला पाणी असल्याने ती पाण्यात बुडून मृत झाली. दोन वर्षे वयाच्या या मादीचा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या परिसरात मुक्तपणे वावर होता. या मादीने काही शेतकऱ्यांच्या शेळ्याही फस्त केल्या होत्या.
बिबट्या विहिरीत पडल्याचे वनविभागाला समजल्यानंतर ते तातडीने नांदूरमधमेश्वरला आले. दोरखंडाच्या साहाय्याने बिबट्याला वर काढले असता शरीरात पाणी गेल्याने ती फुगलेल्या अवस्थेत होती. याचठिकाणी पंचनामा करून अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगण्यात आले. येवला वनविभागाचे पंडित जाधव, सुद्रिक, भोरूक, पगारे व नांदूरमधमेश्वरचे पोलीसपाटील डांगले आदिंनी या कामी धावपळ केली.

Web Title: Nanduramdhameshwar in the well of a leopard's female dead