नंदिनी संगमावरील घाट सज्ज
By Admin | Updated: August 28, 2015 23:48 IST2015-08-28T23:48:20+5:302015-08-28T23:48:39+5:30
नंदिनी संगमावरील घाट सज्ज

नंदिनी संगमावरील घाट सज्ज
उपनगर : कुंभमेळानिमित्त गोदावरी-नंदिनी नदी संगमावर नव्याने बांधण्यात आलेला घाट सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीसाठी सज्ज झाला आहे.
टाकळी मलनिस्सारण केंद्राशेजारी गोदावरी-नंदिनी नदी संगमाच्या ठिकाणी कुंभमेळ्यानिमित्त पाटबंधारे विभागाकडून नव्याने घाट बांधून सुशोभिकरण करण्यात आले आहे, तर मनपाने त्या ठिकाणी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गोदावरी-नंदिनी नदी संगम होतो त्या ठिकाणी नदी पात्रात एक मोठा खडक असून, त्या ठिकाणी नुकतीच दुतोंड्या मारुतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
पहिल्या पर्वणीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून गोदावरी-नंदिनी संगम घाटावर स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर चकाचक करण्यात आला आहे. स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधादेखील मनपाने उपलब्ध करून दिली आहे. टाकळी मलनिस्सारण केंद्रातूत सोडण्यात येणारे पाणी गोदावरी-नंदिनी नदी संगमाच्या ठिकाणी येऊन मिळत असल्याने त्या ठिकाणी मनपा प्रशासनाने घाटावर क्लोरिन द्रव्याचे प्लास्टिकचे ड्रम ठिकठिकाणी ठेवले असून, त्यातून थेंब थेंब क्लोरिन नदी पात्रात सोडण्यात येत आहे.