नांदगावी तीन दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:17 IST2021-03-18T19:22:25+5:302021-03-19T01:17:17+5:30
नांदगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरपालिकेने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी दिली.

नांदगावी तीन दिवस जनता कर्फ्यू
नांदगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरपालिकेने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी दिली.
शनिवार दि. २० ते सोमवार दि. २२ मार्चपर्यंत असा सलग तीन दिवस हा जनता कर्फ्यू राहणार आहे. दूधविक्री सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत करता येणार आहे. भाजीपाला, फळविक्रेते यांच्यासह सर्व आस्थापनांनी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल मात्र सुरूच राहतील, असेही गोसावी यांनी सांगितले.