शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नांदगावी ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 7:46 PM

नांदगाव : कोट्यवधीच्या थकबाकीवरुन गिरणा धरणाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने योजनेवरील नांदगाव शहरासह दोन लाखांहून अधिक ग्रामीण लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा बाका प्रसंग उद‌्भवला आहे. त्यात सद्यस्थितीत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याची शुद्धता रामभरोसे असल्याने नांदगावकरांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पाणीबाणीच्या संकटातून कधी मुक्तता होते, याकडे नांदगावकरांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देथकबाकीवरुन संघर्ष : शुद्धतेबाबत साशंकता; आरोग्य धोक्यात

सद्यस्थितीत नांदगावी ८० टक्के दहेगाव धरणाचे व २० टक्के माणिकपुंज धरणाचे पाणी व्हाया ह्यजलशुद्धीकरण प्रकल्पह्णद्वारे घरोघरी पोहोचविले जात आहे. आधुनिक जल शुद्धीकरण प्रक्रियेच्या तुलनेत कालबाह्य झालेला प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व तंत्रज्ञान माहिती नसताना तो चालविला जात आहे. त्यामुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली दहा वर्षे दहेगाव धरण कोरडे असल्याने गिरणा धरणाच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेतून आलेले पाणी नांदगावकर पित होते. नगरपरिषदेची पाणी पुरवठा करणारी बहुतांश यंत्रणा केवळ वितरण व्यवस्थेच्या कामावर मग्न होती. आज नळाला गिरणा धरणाचे पाणी येणार की दहेगाव/माणिकपुंजचे यावरून पिण्याचे वेगळे साठे करणारे नागरिक येईल ते पाणी पिण्यास हतबल झाले आहेत.दहेगाव मधून येणारे पाणी स्वच्छ दिसते. याठिकाणी आठवड्यातून एकदा तुरटी टाकली जाते अशी माहिती शुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली. शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. पूर्वापार चालत आलेले डोस व केमिकल पुरविणारे यांच्या माहितीतून प्रकल्प राबविला जात आहे. नागरिकांना पाणी मिळावे या हेतूने पाणी पुरवठा कर्मचारी तुटपुंज्या संख्येने दिवस रात्र काम करत आहेत. धरणातून येणाऱ्या पाण्यात सुरूवातीला ब्लिचिंग पावडर टाकली जाते व नंतर सेटलिंग टाकीतून बाहेर जाणाऱ्या पाण्यात द्रवरूप क्लोरिन डायऑक्साईड टाकले जाते. पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्य मात्र कुठल्याही यंत्रणेला नसल्याचे दिसून येत आहे. थकबाकीच्या विवादात सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा धोका उभा राहिल्यानंतर कागदी सोपस्कारात अडकलेली यंत्रणा व राजकारणात कुरघोडी करणाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयसुतक उरलेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.दर मंजुरीवरून घोडे अडलेह्यनाक दाबले की तोंड उघडतेह्ण या न्यायाने जिल्हा परिषद प्रशासनाने आर्थिक कारवाईचा बडगा उगारल्याने नगर परिषद प्रशासन कामाला लागले असले तरी अधिक रकमेचा दर मंजूर (आधीचा ३.४० व नवीन सुमारे ७.१५ रूपये) झाल्याशिवाय व मोठी रक्कम अदा केल्याशिवाय जिल्हा परिषदेकडून गिरणाचे पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगरपरिषदेची बैठक तातडीने बोलावून निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. बैठकीत नवीन दर मंजूर झाला की रक्कम अदा करू अशी माहिती मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात