नांदगाव-मांडवड रस्त पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:36 IST2020-10-14T22:11:34+5:302020-10-15T01:36:25+5:30
नांदगांव : नांदगाव मांडवडला जोडणारा एकमेव रस्ता समस्यांनी ग्रस्त झाला आहे. तालुक्यातील मांडवड, लक्ष्मीनगर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांना जोडणारा रस्ता त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व खड्यांमुळे वाहतुकीला दुरापास्त झाला असून मांडवडला जाणारी बस सेवाही बंद करण्यात आली आहे.

नांदगावच्या दहेगाव नाक्या जवळ रेल्वे पुलाच्या बोगदा रस्ता घुसलेले पाणी.
नांदगांव : नांदगाव मांडवडला जोडणारा एकमेव रस्ता समस्यांनी ग्रस्त झाला आहे. तालुक्यातील मांडवड, लक्ष्मीनगर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांना जोडणारा रस्ता त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व खड्यांमुळे वाहतुकीला दुरापास्त झाला असून मांडवडला जाणारी बस सेवाही बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावर दोन ठिकाणी, नांदगाव शहरात दहेगाव नाक्याजवळ व मांडवडच्या अलीकडे महापुरुष या स्थानाजवळ मोठे खड्डे पडले असून त्यात दोन ते अडीच फुट उंचीचे पाणी साठ्ले आहे. दिवसा व रात्री दुचाकी वाहने या पाण्यात घसरून दुचाकी स्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागणी करून हि हे खड्डे बुजवले जात नाहीत व रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने मांडवड व लक्ष्मीनगर या गावात असंतोष आहे. गावांना जाण्यासाठी राञीचा प्रवास करायला लोक घाबरत आहेत. शहराजवळ दहेगांव नाक्याचा रस्ता नदीला आलेल्या पुरात वाहून गेला. लोक पाण्यातून मार्ग काढतात वाहणाऱ्या पाण्यातुनच पुढे जावे लागते त्यानंतर पाटखाना शिवारात महापुरूष मंदीराजवळ शाकंबरी नदीवरील पुलाचे कॉंक्रीट पाण्यात वाहून गेल्याने खराब झाला आहे. याच रस्त्यावरून नांदगांव, मांडवड, क्रांती नगर, पाटखाना,सावता नगर हि वाडी वस्ती व गावे लागतात.