नांदगावी कोरोना आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:44 IST2021-04-29T21:46:10+5:302021-04-30T00:44:57+5:30

नांदगाव : कोरोना मुक्तीसाठी तालुकास्तरीय अधिकारी वर्गाची येथील पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

Nandgaon Corona Review Meeting | नांदगावी कोरोना आढावा बैठक

नांदगावी कोरोना आढावा बैठक

ठळक मुद्देशिंदे यांनी कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.

नांदगाव : कोरोना मुक्तीसाठी तालुकास्तरीय अधिकारी वर्गाची येथील पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी नांदगाव तालुक्यातील विविध कोरोना केंद्रांना भेटी देऊन शिंदे यांनी कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. शिंदे यांनी साकोरे, कळमदरी येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष व प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी गणेश चौधरी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Nandgaon Corona Review Meeting