नकली नवरी प्रकरणी नांदगावी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:54 IST2021-02-09T22:26:35+5:302021-02-10T00:54:10+5:30
नांदगाव : लग्नासाठी नकली नवरी उभी करून ३ लाख ९९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नकली नवरी प्रकरणी नांदगावी गुन्हा दाखल
नांदगाव : लग्नासाठी नकली नवरी उभी करून ३ लाख ९९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मागच्या वर्षी नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे दि. २४ जून २०२० रोजी घडली होती. त्यासंदर्भात गुन्हा मंगळवारी (दि.९) रोजी सायंकाळी दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातला वडकी नाला गावचा नीलेश दरेकर (३४) वडापाव विक्रेता याने फिर्याद दिली असून संशयित आरोपी संतोष उगलमुगले, मालेगाव, योगेश वाघ (रावळगाव), बालाजी आहेर (पत्ता माहीत नाही), विजय चव्हाण (रावळगाव), पूजा शिंदे (रा. एकरुखे, ता. राहता जिल्हा अहमदनगर), मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शीतल मोरे यांनी संगनमताने फसवले अशी तक्रार केली आहे.
गंगाधरी येथे पार पडलेल्या लग्नात पूजा शिंदे हिला तीन लाख रुपये रोख, ९० हजारांचे सोन्याचे व ९१०० रुपयांचे चांदीचे दागिने फिर्यादी नीलेश याने घातले. त्यानंतर संशयित पूजाचे नातेवाईक असल्याचे भासवून तिला घेऊन फरार झाले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगावचे पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.