नांदगावी कांदा चाळीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:51 IST2019-05-10T17:50:32+5:302019-05-10T17:51:58+5:30
नांदगाव : नांदगांवनजिक एक कि. मी. अंतरावर श्रीरामनगर येथे बजरंग वे ब्रिजजवळ कांदा चाळीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून ३ हजार क्विंटल कांदा जळून खाक झाला. या आगीमुळे सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

नांदगावी कांदा चाळीला आग
नांदगाव श्रीरामनगर येथे नांदगाव- मनमाड रस्त्यावर बहिणाबाई पेट्रोल पंपासमोर कांदा व्यापारी साहेबराव खैरनार व सुपडू महाजन यांच्या कांदा चाळी आहेत. दररोज २५ ते ३० मजूर या कांदा चाळीवर काम करतात . दुपारी अचानक कांदा चाळीच्या वरच्या भागातून धुर येऊ लागला. चटई, बांबू, प्लॅस्टीक कागद, बारदान वापरून बनविलेल्या दोन कांदा चाळींना अचानक आग लागली. अग्नीशामन दलाचे बंब येण्याआधीच भडका झाल्याने कांदा चाळ जळून खाक झाली. नागरिकांनी आग विझविण्यावा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. श्रीरामनगरमधील नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याने आग इतरत्र पसरली नाही. आगीचे कारण कळाले नसून अधिक तपास नांदगांवचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग चौगुले करीत आहेत .