शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

‘नंद के घर आनंद भयो’वर धरला ठेका रंगिलो नखरालो राजस्थान : माहेश्वरी महिला मंडळाच्या स्नेहसंमेलनात नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:14 AM

नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायरीसह तितक्याच चपखलतेने होत असलेले निवेदन या साºयांमुळे सखी भारावल्या होत्या.

ठळक मुद्देसर्व सणांवर आधारित गाणी मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ

नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायरीसह तितक्याच चपखलतेने होत असलेले निवेदन या साºयांमुळे सखी भारावल्या होत्या. निमित्त होते ‘रंगिलो नखरालो राजस्थान’ कार्यक्रमाचे.गुरुवारी (दि.४) सायंकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात माहेश्वरी महिला मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमास शहरातील माहेश्वरी समाजबांधवांचा उदंड प्रतिसाद लाभला. गणेश वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर विविध ग्रुपतर्फे ‘बम बम भोले’,‘तिज त्योहार’, ‘घुमर घुमर’, ‘संदेशे आते है’, ‘हाथो मे पूजा की थाली’, नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की’ आदी नृत्य सादर करण्यात आले.स्मिता लोया यांनी प्रास्तविक केले. उज्ज्वला मुंदडा, मोहिनी चांडक, नीलम भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संगीता कलंत्री, वर्षा बांगड, सुषमा लोया, शिल्पा जाजू, वैशाली मुंदडा, जयमाला बंग, रख्मा चांडक आदींसह माहेश्वरी समाजबांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. माहेश्वरी समाजात वर्षभर साजºया होणाºया ‘गणगौर, तीज, करवा चौथ’ आदींसह सर्व सणांवर आधारित गाणी यावेळी नृत्यासह सादर करण्यात आली. लहान मुलीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी यावेळी एकाहून एक सरस नृत्ये, नाट्य, चुटकुले सादर केले. माहेश्वरी महिला मंडळातर्फे आयोजित या स्नेहसंमेलनाचे हे पहिलेच वर्ष असून, उपनगरातील सर्व माहेश्वरी मंडळांचा या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आल्या. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.