नामपूर येथे ३५ तोळे सोन्यासह अकरा लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: December 1, 2014 01:24 IST2014-12-01T01:23:50+5:302014-12-01T01:24:17+5:30
नामपूर येथे ३५ तोळे सोन्यासह अकरा लाखांचा ऐवज लंपास

नामपूर येथे ३५ तोळे सोन्यासह अकरा लाखांचा ऐवज लंपास
नामपूर : येथील दुर्गामाता चौकातील किराणा व्यापारी यांच्या घरातून चोरट्यांनी ३५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. नामपूर शहरात सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचेवातावरण पसरले आहे. दुर्गामाताचौकातील भर वस्तीत अब्बास बोहरी यांचे किराणा दुकान असून,वरच्या मजल्यावर घर आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी बोहरी कुटुंबीय खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी बोहरी यांच्या घराचा मागचा दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची नाणी, हार असे पस्तीस तोळे सोने, हैद्राबादी बांगड्या, रोख रक्कम असा सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. सकाळी दुकान उघडल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. घटनेनंतर नाशिक येथील ठसे तज्ज्ञांना पचारण करण्यात आले होते. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक मोरे, एस. एस. मोरे आदि पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)