अक्राळे एमआयडीसी नावालाच,ना शेतजमीन राहिली, ना उद्योग आले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST2021-06-16T04:19:43+5:302021-06-16T04:19:43+5:30

नाशिक- नवीन उद्योगांसाठी जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे औद्याेगिक वसाहत साकारण्यात आली असली तरी त्याठिकाणी थंड प्रतिसाद लाभल्याने अद्याप ...

In the name of Akrale MIDC, no agricultural land remained, no industry came! | अक्राळे एमआयडीसी नावालाच,ना शेतजमीन राहिली, ना उद्योग आले !

अक्राळे एमआयडीसी नावालाच,ना शेतजमीन राहिली, ना उद्योग आले !

नाशिक- नवीन उद्योगांसाठी जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे औद्याेगिक वसाहत साकारण्यात आली असली तरी त्याठिकाणी थंड प्रतिसाद लाभल्याने अद्याप अपेक्षित उद्योग साकारलेले नाही. त्यामुळे उद्योग येतील या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात जागा देणाऱ्यांवर मात्र नामुष्की ओढावली आहे. शेतजमीन राहिली नाही आणि उद्योग आले नसल्याने रोजगारही मिळाला नाही अशी दिंडोरी तालुक्यातील गावांची अवस्था आहे.

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील जागा संपुष्टात आल्याने उद्योजकांच्या संघटनांनी वेळोवेळी नव्या एमआयडीसीची मागणी केली होती. विशेषत: सध्याच्या सातपूर अंबड मार्गालगत विल्होळी असो किंवा अंबड लगत पांजरापोळला दिलेली जागा असो याठिकाणी अतिरिक्त एमआयडीसी साकारण्याची मागणी होत होती. परंतु एमआयडीसीने दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील जागा निवडली. याठिकाणी ३७२ हेक्टर जमिनीपैकी २०६ हेक्टर जमीन ताब्यात आहेत. याठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा नाही. त्यातच भूखंडांचे दर अवाजवी असल्याचे सांगून उद्येाजकांनी त्याकडे पाठ फिरवली. शासनाने दर कमी केले परंतु तेही विशिष्ट मुदतीसाठीच. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. उद्योगच येत नसल्याने परिसरातील युवकांचे रोजगाराचे स्वप्नही भंगले आहे.

इन्फो..

घोडे कुठे अडले?

- मुंबई आग्रा रोडलगत उद्योजकांना जागा हवी आहे. मात्र, ही वसाहत दिंडोरी तालुक्यात असल्याने महामार्गापासून दूर आहे.

- भूखंडाचे दर ३ हजार रूपये चौरस मीटर इतके होते, ते कमी करून २७०० रूपये चौरस मीटर इतके ठेवण्यात आले. मात्र, तेही जास्त आहेत.

- भूखंडाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी कायम असल्याने उद्योजकांनी प्रतिसाद दिलेला नाही.

- परिसरात खूप गावे नसल्याने अनेकांना मनुष्यबळाचा देखील प्रश्न भेडसावत आहे. बाहेरून मनुष्यबळ मिळणे शक्य होत नाही.

इन्फो...

एकही उद्येाग सुरू नाही

- सुमारे दहा वर्षे उलटून गेली तरी या ठिकाणी उद्योजक जाण्यास तयार नाही. केवळ चौकशी करतात.

- काही उद्योजकांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. मात्र, ते निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.

- लघु उद्योजक तेथे जाण्यास तयार आहेत, मात्र याठिकाणी एखादा मोठा उद्योग आल्यास पूरक उद्योग येण्यास तयार नाहीत.

इन्फो....

रोजगार मिळेल हे स्वप्नच!

कोट

रोजगार मिळेल म्हणून परिसरातील ग्रामस्थांनी अक्राळे तळेगाव येेथील जमिनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, त्यातील अनेकांचा मोबदला बाकी आहे. एमआयडीसीने येथे उद्योग सुरू करून कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. शेतकऱ्यांची घरे, विहिरी गेल्या. त्याचाही आर्थिक मोबदला मिळालेला नाही. लोकप्रतिनिधीही त्याची दखल घेत नाहीत.

- सुनील गाडे पाटील, ग्रामस्थ (छायाचित्र आर फोटोवर)

कोट...

शासनाच्या दिरंगाईमुळे पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही तळेगाव- अक्राळे परिसरातही एकही उद्याेग सुरू झाला नाही. त्यामुळे जमीन गमावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना बेराेजगारीला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने एमआयडीसी सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा याच उद्योगात रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, ते भंगले आहे.

- समाधान तांबडे, तळेगाव (छायाचित्र आर फोटोवर)

कोट...

शेतजमिनी देताना याठिकाणी मोठमोठे उद्योग येतील आणि ग्रामस्थांना रोजगार मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र, अजून उद्योग सुरू झालेले नाही. शासनाने याची दखल घेऊन तातडीने उद्योग सुरू करावेत आणि रोजगार उपलब्ध करून द्यावेत.

- संदीप शांताराम केंदळे,(छायाचित्र आर फोटोवर)

-------------

इन्फो..

तळेगाव अक्राळे एमआयडीसी

३७२

जमीन अधिग्रहित

२०१४

वर्ष

०२

उद्योजकांना भूखंड वाटप

-----

दोन छायाचित्रे १५ एमआयडीसी, १५एमआयडीसी १ यानावाने आर फोटेावर सेव्ह आहे.

Web Title: In the name of Akrale MIDC, no agricultural land remained, no industry came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.