शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुर्गम भागातील धार्डेदिगर अंगणवाडी चे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामाकंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 4:16 PM

कळवण : धार्डेदिगर सारख्या अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असुन राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंगणवाडीचे नामांकन झाल्याने त्यांचा आदर्श इतरही अंगणवाडीने घेऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचवावे असे आवाहन धार्डेदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देपोषण रथ पारपांरीक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

कळवण : धार्डेदिगर सारख्या अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असुन राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंगणवाडीचे नामांकन झाल्याने त्यांचा आदर्श इतरही अंगणवाडीने घेऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचवावे असे आवाहन धार्डेदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले आहे.कळवण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील धार्डेदिगर येथील अंगणवाडीत उत्कृष्ट पोषण आहार महासप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावरून त्या बोलत होत्या . पोषण आहारा निमित्ताने गावात घरोघर गुढ्या उभारण्यात आल्याने व पोषण रथ पारपांरीक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, पंचायत समितीचे सभापती लालजी जाधव, महिला व बालविकासचे प्रकल्प अधिकारी एस. बी. शिंदे, सरपंच ललीता जाधव उपस्थित होते.१ ते ३० आॅक्टोंबर सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्र म म्हणून संपुर्ण राज्यात साजरा करण्यात येत असुन यात कुपोषण मुक्तीसाठी ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना उत्कृष्ट पोषण आहार व जनजागृती व्हावी यासाठी विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धार्डेदिगर येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी पोषण आहार, पालेभाज्या व कडधान्ये यांचे महत्व वेगवेगळ्या नाटकांद्वारे ग्रामस्थांना समजावून सांगितलेअंगणवाडी सेविका अंजना गांगुर्डे यांनी शासकीय निकषाप्रमाणे पोषण आहाराचे वितरण करु न कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणल्याने त्याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचे नामांकन पाठवण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी सांगितले.याप्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीचे पोषण आहार व आरोग्यदायी पालेभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. उत्कृष्ट रांगोळीही काढण्यात आली होती. तसेच कुपोषीत बालकांच्या पालकांना अंडी देणारी प्रत्येकी दोन दोन कोंबडी वाटप करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी एस. डी. महाले, प्रकल्पचे राजेंद्र मोरे, एस. डी कांगणे, मुख्यसेविका श्रीमती बी. पी सावकार, के. डी गौतम, प्राथमिक शिक्षक यु. बी. गावित, दिपक जगताप, ग्रामसेवक के. पी. सुर्यवंशी काशीनाथ बहिरम, शांताराम बहिरम, कैलास बहिरम, पोपट बहिरम, दिपक देशमुख, त्र्यंबक ठाकरे, निवृती बहिरम, बापु जगताप, शांताराम ठाकरे, विठ्ठल माळी, सुनिता देशमुख यांच्यासह प्रकल्प दोन मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस व ग्रामस्थ उपस्थितीत होते.चौकट --- गरोदर काळात नियमति अमृत आहार घेतल्याने माझी प्रसुती साधारण झाली व माङया नवजात बालकाचे चांगल्या प्रकारे पोषण झाल्याने बालक सदृड आहे - अनिता गायकवाड, स्तनदा माता, धार्डेदिगर.