नमिता कोहोक यांनी पटकावला ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’चा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:25 IST2017-07-27T00:25:34+5:302017-07-27T00:25:49+5:30
नाशिक : मिसेस इंटरनॅशनल या किताबाच्या मानकरी असणाऱ्या नमिता कोहोक यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ हा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

नमिता कोहोक यांनी पटकावला ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’चा किताब
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मिसेस इंटरनॅशनल या किताबाच्या मानकरी असणाऱ्या नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ हा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी हा किताब पटकावला असून, हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. अमेरिकेत पार पडलेल्या या स्पर्धेत नमिता कोहोक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कॅन्सर क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच समाजसेवेला वाहिलेल्या आणि पूर्ण जगात काम करत असलेल्या संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेंडी लिंडबर्ग यांनी ग्लोबल युनायटेडची स्थापना केली. ही संस्था समाजातील इतर समाजसेवी संस्थांसोबत मिळून काम करते. संस्थेअंतर्गत जगभरात महिला शक्तीचा उपयोग करत सामाजिक सेवा केली जाते. या स्पर्धेतील विजेत्या असलेल्या महिला कॅन्सरशी निगडित काम करत असतात. या क्षेत्राशी निगडित सामाजिक उपक्रमात भाग घेणाऱ्यांनाच या स्पर्धेत उपयोगी होता येते. त्यामुळे या स्पर्धेत जी सौंदर्यवती निवडली जाते तिच्या मुकुटामध्ये एक सुवर्णत्रिकोण रिबीन असते. हे कॅन्सरसोबत लढाईचे चिन्ह आहे.
पहिल्या भारतीय महिला
२०१५ मध्ये मिसेस इंटरनॅशनला किताब नमिता कोहोक यांनी कॅन्सरवर मात करत २०१५ मध्ये यांगून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत पहिला किताब पटकावला होता. असा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.