लक्ष्मीनगरला पोषण पखवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 19:12 IST2019-03-19T19:12:00+5:302019-03-19T19:12:54+5:30
मांडवड : महीला व बालविकास विभागाच्या ८ ते २२ मार्च दरम्यान राबविण्यात येत असलेल्या पोषण पखवाड्याचे कार्यक्र म मंगळवारी (दि.१९) लक्ष्मीनगर येथे महीला व किशोर वयीन मुलींच्या सहभागाने राबविण्यात आला.

शासनाच्या पोषण पखवाडा या कार्यक्र मादरम्यान गावात बैलगाडीतुन मिरवणुक काढतांना महीला व मुली.
मांडवड : महीला व बालविकास विभागाच्या ८ ते २२ मार्च दरम्यान राबविण्यात येत असलेल्या पोषण पखवाड्याचे कार्यक्र म मंगळवारी (दि.१९) लक्ष्मीनगर येथे महीला व किशोर वयीन मुलींच्या सहभागाने राबविण्यात आला.
यामध्ये किशोरी मुलीचे खाद्य पदार्थाचे वस्तु बनविण्याच्या स्पर्धा ठेऊन विजेत्या मुलींना बक्षीस देण्यात आले. त्याच प्रमाणे गावात विविध प्रकार असलेल्या बैलगाडीतुन टाळ मृदुंगाच्या तालावर महीलांची व मुलीची मिरवणुक काढण्यात आली.
विषेश म्हणजे मिरवणुकीत टाळ, विणेकरी व मृदुंग वाजविणारे सर्व बाल कलाकारच होते.
या कार्यक्र मासाठी गाव परीसरातील सर्व महीला व किशोरवयीन मुलींनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्र मानंतर सर्व उपस्थीत महीला व मुलींना पुरण पोळीचे मिष्ठान्न भोजन देण्यात आले. या कार्यक्र मासाठी गावातील अंगणवाडी सेविका लक्ष्मीबाई राजगुरु व मदतनीस लक्ष्मीबाई जाधव यांचे सहकार्य लाभले. पर्यवेक्षक ललिता चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.