नगरसुलला दुसऱ्यादिवशी बाजार पेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 19:09 IST2021-03-14T19:07:27+5:302021-03-14T19:09:46+5:30
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पालन करीत संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास सर्व गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण काही दुकानदार व शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते.

नगरसुलला दुसऱ्यादिवशी बाजार पेठेत शुकशुकाट
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पालन करीत संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास सर्व गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण काही दुकानदार व शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते.
त्यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोरख निकम व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बाजार बंद आहे. सुचना देत आलेल्यांना परत पाठविले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठवडे बाजार बंद, शाळा बंद, तसेच दर शनिवार, रविवारी बंद, गावातील व शहरात दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुली त्या नंतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून तोंडाला मास्क सक्तीचे केले आहे.
नगरसुल गावात शनिवारी बाजार पेठत काही दुकाने सुरु होती, संध्याकाळी पोलिस येताच सर्व बंद केले गेले. रविवारी (दि.१४) संपूर्ण बाजारपेठत शुकशुकाट पहावयाला मिळाला. नगरसुल ग्रामपंचायतीने गावात सुचनाही दिलेल्या आहेत. नगरसुल गावात कोरोनाचा शिकाव झाला असून त्यावर उपाय योजना करणे तितकेच गरजेचे आहे. कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत असून होमकोरंमटाइनच्या नावाखाली घरी न थांबता गावात फिरत असल्याची चर्चा आहे. आता अश्या लोकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.