नागरेचा साथीदार फरार

By Admin | Updated: January 2, 2017 01:32 IST2017-01-02T01:32:06+5:302017-01-02T01:32:19+5:30

नागरेचा साथीदार फरार

Nagar's partner absconded | नागरेचा साथीदार फरार

नागरेचा साथीदार फरार

नाशिक : बनावट नोटा छापून त्या कमिशनवर बदलून देण्याचा गोरखधंदा करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह अकरा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि़ २) संपणार आहे़ नागरेचा बारावा साथीदार अद्यापही फरार आहे़ नोटा तपासणीचा अहवालही मिळालेला नाही़
पोलिसांनी हॉटेल जत्रासमोर अकरा संशयितांना अटक केली होती़ त्यांच्याकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा, तसेच १ लाख ८० हजार रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या होत्या़ संशयितां मध्ये छबू नागरे, रामराव पाटील- चौधरी, डॉ़ प्रभाकर घरटे, रमेश पांगारकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपणार आहे़
पोलिसांसमोर आॅसम ब्युटी पार्लरमध्ये प्रत्यक्ष नोटा छपाईचे काम करणाऱ्या बाराव्या साथीदारास अटक करण्याचे आव्हान होते, मात्र त्याचा शोध घेण्यात यश आलेले नाही़ जप्त बनावट नोटा तपासणीसाठी नाशिकरोडला इंडिया सिक्युरिटी प्रेसकडे पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवालही अद्याप मिळालेला नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Nagar's partner absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.