धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी निफाडला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:44 IST2018-08-13T21:43:40+5:302018-08-13T21:44:36+5:30
निफाड तालुका सकल धनगर समाज समितीच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी निफाडला मोर्चा
निफाड : निफाड तालुका सकल धनगर समाज समितीच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील अकोलखास गल्लीतील बिरोबा मंदिरापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी वाद्यवृंद होता तसेच मेंढ्यांचा कळप आणण्यात आला होता. मोर्चा निफाड तहसील कार्यालय येथे आल्यानंतर सभा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण धनगर आरक्षण संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ओहोळ, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी ढेपले, निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे, निफाडचे माजी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, दत्तात्रय सुडके, रामनाथ पल्हाळ यांची भाषणे झाली. मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, शहीद परमेश्वर धोंडगे यांच्या कुटुंबीयांना पंचवीस लाखांची मदत द्यावी, धनगर समाजातील तरु णावर आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाप्रसंगी झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, धनगर समाजातील मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी गायरान जमिनी उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी दत्तू सुडके, शिवाजी सुपनर, संतोष पल्हाळ, भाऊसाहेब फटांगरे, बाबासाहेब शिंदे, गोरख गाढे, भास्कर ढेपले, शंकर ढेपले, चंद्रकांत पानसरे, अनुप वन्से, शरद ढेपले, भाऊसाहेब साबळे आदींसह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.