रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 18:09 IST2020-09-17T18:08:55+5:302020-09-17T18:09:41+5:30
खर्डे : खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत असलेल्या रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आला.

रामेश्वर येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करताना उपसरपंच विजय पगार. समवेत डॉ. कविता निकम, वैशाली येळीज, पी. के. सोनवणे आदी.
ठळक मुद्देमोहिमेचा शुभारंभ उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते
खर्डे : खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत असलेल्या रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेद्वारे कोरोना विरु द्ध लढताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येईल. याप्रसंगी डॉ. कविता निकम, ग्रामसेविका वैशाली येळीज, मुख्याध्यापक पी. के. सोनवणे, आशा वर्कर शैलजा गायकवाड, सरला ठाकरे,अंगणवाडी सेविका जिजाबाई पगार, रेखा पवार, यशोदाबाई पगार आदी उपस्थित होते .